शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आत्मनिर्भरतेसाठी पाऊल ; मूकबधिरांनी बनविल्या राख्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 14:33 IST

सोलापुरातील ममता मूकबधिर विद्यालयातील उपक्रम

ठळक मुद्दे सुमारे ५०० राख्या येथील विद्यार्थ्यांनी तयार केल्याव्यवहारज्ञान प्रात्यक्षिकातून मिळवून देणे हा यामागील आमचा हेतू - वाबय्या म्हेत्रे

सोलापूर : सोलापुरातील ममता मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या बहीण-भावाच्या नात्यातील गोडवा वाढविणाºया ठरत आहेत. व्यवसाय शिक्षणांतर्गत ‘ना नफा ना तोटा’ या धर्तीवर येथील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्यांच्या विक्रीच्या निमित्ताने या विद्यार्थ्यांच्या चेहºयावर झळकणारा स्वनिर्मितीचा आनंद बरेच काही सांगून जाणारा ठरत आहे.

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लार्इंड जिल्हा शाखेच्या वतीने येथील उत्तर सदर बझार परिसरात ममता मूकबधिर विद्यालय चालविले जाते. येथे पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेणारी ७५ मुले-मुली आहेत.

शालेय शिक्षणासोबत या विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षणांतर्गत राखी मेकिंगसह अन्य प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. दरवर्षी राख्या तयार करणे, दिवाळीसाठी पणत्या, ग्रीटिंग, आकाश कंदील तयार करणे, रंगपंचमीला पर्यावरणपूरक रंग तयार करण्याचे प्रशिक्षण या शाळेतील कलाशिक्षिका नीता देशपांडे या देतात. बाजारातून कच्चा माल आणून ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर वस्तू तयार करायच्या, त्यानंतर शाळेसमोरच स्टॉल लावून त्याची विक्री विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करायची, असा हा प्रकार असतो.

यंदाही राखी सणानिमित्त सुमारे ५०० राख्या येथील विद्यार्थ्यांनी तयार केल्या आहेत. त्यांची विक्रीही शाळेतच दुकान लावून सुरू आहे. परिसरातील नागरिक, पालक मोठ्या आनंदाने त्या खरेदी करतात. विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान कळावे, यासाठी विक्रीचा व्यवहार, हिशेब ठेवणे, हिशेब तपासणे या जबाबदाºयाही त्यांच्याकडूनच करून घेतल्या जातात. यामुळे त्यांच्यामध्ये आपोआपच व्यवहारज्ञान विकसित होत असते. 

भविष्यात शाळेतून बाहेर पडल्यावर या विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, यासाठी आम्ही असे उपक्रम राबवित असतो. यामागे नफ्याची भावना नसून विद्यार्थ्यांमध्ये कला विकसित करणे, त्यांना व्यवहारज्ञान प्रात्यक्षिकातून मिळवून देणे हा यामागील आमचा हेतू असतो. आमच्या कलाशिक्षिका नीता देशपांडे यांचे यात सक्रिय योगदान असते.- वाबय्या म्हेत्रे, मुख्याध्यापक

टॅग्स :SolapurसोलापूरRaksha Bandhanरक्षाबंधनSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका