शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

किल्ल्याच्या तटबंदीत सजणार सोलापुरातील छत्रपती संभाजीराजेंचा पुतळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 11:07 IST

वर्कआॅर्डरचा प्रस्ताव मनपासमोर : २० फेब्रुवारी रोजी होणार अंतिम निर्णय

ठळक मुद्देस्मार्ट सिटी योजनेतून पासपोर्ट कार्यालयाजवळ अ‍ॅडव्हेंचर पार्क साकारण्यात आले छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण व्हावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी केलीमनपाने नावीन्यपूर्ण योजनेतून ९१ लाख रुपयांच्या कामाचा प्रस्ताव तयार केला

सोलापूर :  जुना पुणे नाका येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरात किल्ल्याच्या बुरजाची प्रतिकृती साकारली जाणार आहे. या कामाच्या वर्कआॅर्डरचा प्रस्ताव मनपाच्या गुरुवार २० रोजी होणाºया सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर आहे. 

मनपाची मागील सभा कोरमअभावी तहकूब करावी लागली होती. त्यामुळे जैवविविधता समितीला मान्यता, खुल्या जागेवरील युजर चार्जेस माफ करणे आदी प्रस्ताव प्रलंबित राहिले. गुरुवार, दि. २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता पुन्हा सभा होणार आहे. या सभेच्या अजेंड्यावर शहरातील विकासकामांचे प्रस्ताव आहेत. 

छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण व्हावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी केली होती. मनपाने नावीन्यपूर्ण योजनेतून ९१ लाख रुपयांच्या कामाचा प्रस्ताव तयार केला. मुंबईच्या चेंबूरमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळा परिसरात किल्ल्याचा बुरुज, तोफखाना, मावळे यांची प्रतिकृती आहे. या धर्तीवर पुण्यातील आर्किटेक्चर नकुल रेगे यांनी आराखडा केला. त्याची निविदा मंजूर झाली. सोलापूरच्या मक्तेदाराने पाच टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दाखवली. वर्कआॅर्डरचा प्रस्ताव सभेसमोर आहे. १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे. तत्पूर्वी बहुतांश काम पूर्ण व्हावे. यासाठी महापालिका पदाधिकारी आणि नगर अभियंता कार्यालयाने प्रयत्न करावेत, अशी मागणी केली. 

अ‍ॅडव्हेंचर पार्कचा प्रस्ताव प्रलंबित - स्मार्ट सिटी योजनेतून पासपोर्ट कार्यालयाजवळ अ‍ॅडव्हेंचर पार्क साकारण्यात आले आहे. हे पार्क महापालिकेने स्मार्ट सिटी कंपनीकडून हस्तांतरित करून घेतले नाही. हस्तांतरणाचा प्रस्ताव पुढील सर्वसाधारण सभेत घेऊ. फेब्रुवारी महिन्यात अ‍ॅडव्हेंचर पार्कचे उद्घाटन करू, असे महापौर श्रीकांचना यन्नम यांनी सांगितले होते. मनपा पदाधिकाºयांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला नाही. त्यामुळे या महिन्यातील सभेतही पार्कच्या हस्तांतरणाचा प्रस्ताव घेण्यात आलेला नाही. कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेले अ‍ॅडव्हेंचर पार्क धूळखात आहे. 

शिक्षकांना मिळणार सातव्या वेतन आयोगाचा लाभ !- मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाकडील शिक्षक, शिक्षकेतर व सेवानिवृत्त सेवकांनी सातव्या वेतन आयोगानुसार वेतन व निवृत्तीवेतन अदा करावे, अशी मागणी केली आहे. राज्य शासनाने त्याला मंजुरी दिली आहे. मनपाला ५० टक्क्यांप्रमाणे हिस्सा द्यावा लागणार आहे. यासाठी लागणाºया निधीची २०१९-२० च्या अंदाजपत्रकामध्ये तरतूद करण्यात यावी, असा प्रस्ताव प्रशासनाने सभेकडे पाठविला आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज