शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

सोलापुरातील असंघटित कामगारांच्या ३० हजार घरांसाठी १२० ऐवजी ३०० कोटी देणार राज्य सरकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 12:36 IST

गृहनिर्माणमंत्र्यांचा निर्णय; बापूजीनगरातील २५६ गाळ्यांचे व्याज व दंड माफीचा निर्णय

ठळक मुद्देबापूजी नगरच्या परिसरात १९६६ साली १० एकर जागेत २५६ गाळे म्हाडामार्फत बांधण्यात आलेसर्वांसाठी घरे-२०२२ प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कुंभारी येथे सोलापुरातील ३० हजार असंघटित कामगारांसाठी रे नगर फेडरेशनमार्फत गृहप्रकल्प साकारण्यात येत आहे

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे कामगारांसाठी साकारण्यात येत असलेल्या ३० हजार घरांच्या रे नगर प्रकल्पासाठी महाराष्टÑ सरकारकडून १२० कोटींऐवजी ३०० कोटी अनुदान लवकरच देण्याचा निर्णय गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत घेतला.

सर्वांसाठी घरे-२०२२ प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कुंभारी येथे सोलापुरातील ३० हजार असंघटित कामगारांसाठी रे नगर फेडरेशनमार्फत गृहप्रकल्प साकारण्यात येत आहे. या प्रकल्पास राज्य शासनाने अनुदानाचा पहिला टप्पा १२० कोटी रुपयांचा मंजूर केला होता. यातील २५ कोटी ८७ लाख रुपये दिले होते, परंतु राज्य गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नुकतीच रे नगरच्या प्रकल्पस्थळी प्रत्यक्षात भेट देऊन कामाची पाहणी केली.  या प्रकल्पाला गती देण्यासाठी आणखी अनुदानाची गरज असल्याची बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य शासनाच्या वतीने ३०० कोटी देण्याचा निर्णय मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती नरसय्या आडम यांनी दिली. 

त्याचबरोबर बापूजी नगरच्या परिसरात १९६६ साली १० एकर जागेत २५६ गाळे म्हाडामार्फत बांधण्यात आले. १९६९ साली या ठिकाणी लोक वास्तव्यास गेले. यातील लाभार्थी  आर्थिकदृष्ट्या मागासलेले  समाजाचे लोक राहतात. या लोकांना हे गाळे मालकी हक्काने मिळवून द्यावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती. याबाबत बैठका झाल्या, परंतु हा प्रश्न मार्गी लागलेला नव्हता. या बैठकीत यावर चर्चा झाली याबाबतचा आदेश लवकरच काढण्यात येईल, असे अभिवचन विखे यांनी दिले.

या बैठकीस अतिरिक्त मुख्य सचिव संजीवकुमार, उपसचिव बुधवंत, कक्ष अधिकारी राठोड, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, प्रधानमंत्री योजनेचे अभियंता मुगलीकर , म्हाडाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील, अन्य म्हाडाचे अधिकारी वर्ग तसेच रे नगर  चे मुख्य प्रवर्तक माजी आमदार नरसय्य्या आडम मास्तर व रे नगरच्या अध्यक्षा नलिनी कलबुर्गी, विकासक अंकुर पंधे आदी उपस्थित होते.

केंद्राच्या अनुदानासाठी पाठपुरावा...- रे नगर प्रकल्पाला अद्याप एकही रुपया केंद्र सरकारकडून अनुदान म्हणून प्राप्त झाला नाही. ही तक्रार या बैठकीत लावून धरण्यात आली. यावर मुख्यमंत्री यांच्या मान्यतेने रे नगरसाठी खास बाब म्हणून निर्णय घेतला असून पहिल्या टप्प्यात १२० कोटींऐवजी ३०० कोटी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. कामाच्या प्रगतीनुसार ४० हजार ऐवजी एक लाख रुपये अदा केले जातील. याबाबत शासकीय आदेश काढण्यात येईल व केंद्र सरकारकडून अनुदान मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही देण्यात आली. त्यामुळे  १ मे २०२२ साली रे नगर फेडरेशनची ३० हजार घरे या गरिबांना मिळतील अशा पद्धतीने सकारात्मक निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 

शासनाने यापूर्वी १२० कोटी मंजूर केले होते. हे अनुदान टप्प्याटप्प्याने मिळाले आहे. मुंबईतील बैठकीत गृहनिर्माणमंत्र्यांनी जेवढे काम होईल तेवढी रक्कम तातडीने सोसायटीच्या खात्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. म्हणजे झालेल्या कामाचे जिल्हाधिकाºयांनी प्रमाणपत्र दिले की दुसºया दिवशी खात्यात पैसे जमा होतील. या निर्णयामुळे रे नगरचे काम गतिमान होणार आहे.- नरसय्या आडम,मुख्य प्रवर्तक, रे नगर फेडरेशन वसाहत, कुंभारी

टॅग्स :SolapurसोलापूरHome Ministryगृह मंत्रालयCentral Governmentकेंद्र सरकार