शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राज्य शासनाचे आदेश; राज्यात पहिल्या टप्प्यात होणार ३३०० संस्थांच्या निवडणुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 14:52 IST

राज्य शासनाचे आदेश; ‘पांडुरंग’, ‘विठ्ठलराव शिंदे’च्या निवडणुकीचा बिगुल

ठळक मुद्देसहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यास आजच शासनाने परवानगी दिली प्रक्रिया सुरू झालेल्या राज्यातील ३,३०० संस्थांच्या निवडणुका लगेच सुरू होतीलमुदत संपलेल्या उर्वरित संस्थाच्या निवडणुकीचा कार्यक्रम तयार केला जाईल

सोलापूर : जिल्ह्यातील श्रीपूर येथील श्री. पांडुरंग सहकारी व पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे   मल्टिस्टेट( बहुराजीय) या २०२० मध्ये मुदत संपलेल्या  साखर कारखान्यांच्या निवडणुका फेब्रुवारी व मार्चमहिन्यात होणार आहेत. २०२१ मध्ये मुदत संपणार्या श्री. संत दामाजी, श्री. विठ्ठल गुरसाळे, श्री. संत कुर्मदास व भीमा सहकारी टाकळी सिकंदर या मसाखर कारखान्यांच्याही निवडणुका मार्चनंतर होतील असे सांगण्यात आले.

मागील दीड वर्षापासून रखडलेल्या सहकार खात्याच्या निवडणुकीला अखेर मुहूर्त लागला असून मंगळवारी तसे आदेश शासनाने काढले आहेत. येत्या मार्च २०२१ पर्यंत राज्यातील ६४ हजार ३५३ सहकारी संस्था निवडणुकीला पात्र असल्या तरी निवडणुका सुरू होऊन थांबलेल्या ३,३०० संस्थांच्या निवडणुका लागलीच सुरू होतील, असे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.

राज्यात आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. सहकार खात्याची यंत्रणा कर्जमाफीत अडकल्याने १८ मार्च २०२० च्या आदेशानुसार राज्य शासनाने १७ जून २०२० पर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर १७ जूनच्या आदेशानुसार १६ सप्टेंबरपर्यंत, २६ सप्टेंबरच्या आदेशानुसार  ३१ डिसेंबरपर्यंत तर १६ जानेवारीच्या आदेशानुसार ३१  मार्च २०२१ पर्यंत निवडणुकीला मुदतवाढ देण्यात आली होती. यासाठी शासनाकडून राज्यात कोरोनाचे संकट असल्याचे कारण दाखविले होते. मात्र डिसेंबर-जानेवारी महिन्यात विधान परिषद व ग्रामपंचायत निवडणुका सुरळीत पार पडल्याने शासनाने १६ जानेवारीचा निवडणुका पुढे ढकलण्याचा आदेश २ फेब्रुवारी रोजी रद्द करीत निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. 

ज्या टप्प्यावर निवडणुका थांबविण्यात आल्या आहेत त्या टप्प्यापासून निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झालेल्या राज्यातील ३,३०० संस्थांच्या निवडणुका लागलीच सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.

सोलापूरच्या १९२ संस्था...सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखाना-१, वस्त्रोद्योग-१, पशुपक्षी-शेळीमेंढी, दुग्ध- ५३, उत्तर सोलापूर-१३, मंगळवेढा-२८, सोलापूर शहर-३, करमाळा-१०, मोहोळ-४०, पंढरपूर-१३, सांगोला-१९, बार्शी-११ याप्रमाणे ‘अ’ वर्गातील ३, ‘ब’ वर्गातील २९, ‘क’ वर्गातील २०, ‘ड’ वर्गातील १४० संस्थांच्या निवडणुका लागलीच सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.

सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यास आजच शासनाने परवानगी दिली आहे. प्रक्रिया सुरू झालेल्या राज्यातील ३,३०० संस्थांच्या निवडणुका लगेच सुरू होतील. मुदत संपलेल्या उर्वरित संस्थाच्या निवडणुकीचा कार्यक्रम तयार केला जाईल.- यशवंत गिरी, सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूकPoliticsराजकारण