शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राज्यात मागील वर्षीपेक्षा यंदा द्राक्षाची पाच हजार मेट्रिक टन अधिक निर्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 13:51 IST

एकट्या युरोपियन देशात ७, २७१ कंटेनरमधून ९७ हजार ४६ मेट्रिक टन द्राक्ष निर्यात

सोलापूर: महाराष्ट्रातून यावर्षी (४ एप्रिलपर्यंत) ९७ हजार ४६ मेट्रिक टन म्हणजे ७ हजार २७१ कंटेनर द्राक्ष एकट्या युरोपियन देशात निर्यात झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही निर्यात पाच हजार मेट्रिक टनाने अधिक आहे. येत्या २० एप्रिलपर्यंत ही निर्यात चालेल असे सांगण्यात आले.

महाराष्ट्रातील नाशिक, सोलापूर, सांगली, पुणे, अहमदनगर, सातारा, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यातून प्रामुख्याने द्राक्ष, डाळिब, केळी, फुले व भाजीपाला निर्यात होतो. सध्या द्राक्षाची निर्यात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. महाराष्ट्रातील द्राक्षाची निर्यात प्रामुख्याने युरोपियन देशात होते. यावर्षी आतापर्यंत ९७ हजार ४६ मेट्रिक टन( ७२७१ कंटेनर) द्राक्षाची निर्यात युरोपियन देशात झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत ९२ हजार ३४२ मेट्रिक टन( ६, ८४२ कंटेनर) द्राक्ष निर्यात युरोपियन देशात झाली होती. मागील वर्षीच्या तुलनेत ही निर्यात पाच हजार मेट्रिक टनाने अधिक झाली आहे.

नाशिकचा मोठा वाटा

महाराष्ट्र शासनाच्या कृषी- पणन खात्याच्या निर्यात विभागाकडे झालेल्या नोंदीनुसार एकट्या नाशिक जिल्ह्यातील ८८ हजार ६०२ मेट्रिक टन द्राक्ष युरोपियन देशात निर्यात झाली आहे. सांगली- ५ हजार ४७० मेट्रिक टन. सातारा- २ हजार १४ मेट्रिक टन. लातुर- ४७३ मेट्रिक टन. अहमदनगर- ३५७ मेट्रिक टन. पुणे- २४० मेट्रिक टन. उस्मानाबाद- १४२ मेट्रिक टन. सोलापूर- ६ मेट्रिक टन.

  • 0 नेदरलॅंडला ६२ हजार ८२५ मेट्रिक टन ( ४७३ कंटेनर).
  • 0 युके( युनायटेड किंगडम)- १७ हजार ३०५ मेट्रिक टन ( १२३२ कंटेनर).
  • 0 जर्मनी- ९ हजार २८० मेट्रिक टन ( ७०४ कंटेनर) . इतर लहान- लहान देशातही निर्यात झाली आहे.

 

राज्यातुन यावर्षी द्राक्ष, केळी, डाळिंब, फुलांची निर्यात चांगली झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातून डाळिंबाची निर्यात चांगली झाली आहे व होत आहे. यावर्षी राज्यातीत द्राक्षाची निर्यात एप्रिल अखेरपर्यंत चालेल.

- गोविंद हांडे, निर्यात सल्लागार, महाराष्ट्र शासन

सोलापूर जिल्ह्यात यावर्षी उशिरापर्यंत पाऊस पडत राहिल्याने द्राक्षाच्या गुणवत्तेवर परिणाम झाला. अपेक्षेप्रमाणे मालही लागला नाही. याचा परिणाम नक्कीच निर्यातीवर झाला आहे.

- शिवाजीराव पवार, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ

टॅग्स :SolapurसोलापूरInternationalआंतरराष्ट्रीयAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजार