शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘चालक कम वाहका’मुळे ‘एसटी’ धावणार सुसाट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 11:55 IST

एसटीचा आज वर्धापनदिन; लालपरी झाली ७१ वर्षांची : कर्मचाºयांच्या अपुºया संख्येवर तोडगा

ठळक मुद्देराज्यातील खेड्यापाड्यातून, गावागावांतून जाणारी लालपरी (गरीब रथ) आता ७१ वर्षांचीप्रवाशांचा वेळ वाचून त्यांना अधिक वेगवान सेवा मिळावी यासाठी एस. टी. महामंडळाने राज्यात अनेक मार्गांवर विनावाहक-विनाथांबा बससेवा सुरू

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : प्रवाशांचा वेळ वाचून त्यांना अधिक वेगवान सेवा मिळावी, यासाठी एस. टी. महामंडळाने राज्यात अनेक मार्गांवर विना वाहक-विना थांबा बससेवा लवकरच सुरू करणार आहे़ या सेवेमुळे महामंडळाचा आर्थिक भार हलका होण्याबरोबरच कर्मचाºयांच्या कमतरतेचा विषयही निकाली निघणार आहे़ त्यामुळे नक्कीच एसटी महामंडळ ऊर्जितावस्थेत येणार यात मात्र शंका नसल्याचे मत राज्य परिवहन महामंडळ सोलापूर विभागाचे विभागीय नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

राज्यातील खेड्यापाड्यातून, गावागावांतून जाणारी लालपरी (गरीब रथ) आता ७१ वर्षांची झाली आहे. या लालपरीचा म्हणजेच एसटीचा ७१ वा वर्धापन दिन आज शनिवार १ जून २०१९ रोजी साजरा केला जाणार आहे. या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विभागीय नियंत्रक गायकवाड यांच्याशी साधलेला संवाद.

पुढे बोलताना गायकवाड म्हणाले की, प्रवाशांचा वेळ वाचून त्यांना अधिक वेगवान सेवा मिळावी यासाठी एस. टी. महामंडळाने राज्यात अनेक मार्गांवर विनावाहक-विनाथांबा बससेवा सुरू केली आहे. या सेवेसाठी प्रवाशांना ज्या ठिकाणाहून बस सुटणार आहे तिथेच तिकीट घेता येणार असून, तिथून बस गेल्यानंतर पुढे ती कुठेही न थांबता थेट शेवटच्या स्थानकापर्यंत जाणार आहे़ काही मार्गांवर एक-दोन प्रमुख ठिकाणी बस थांबविल्या जाणार असून, तेथील प्रवाशांचे तिकीट वाहकच काढणार आहे़ या चालक कम वाहकांमुळे प्रवाशांना वेगवान सेवा देण्याबरोबरच कर्मचारी कमतरतेवर तोडगा निघणार आहे.

महामंडळाने सामाजिक बांधिलकी जपली...- एसटी म्हणजे केवळ प्रवाशांची वाहतूक करणारी यंत्रणा एवढेच मर्यादित नसून एसटीने सातत्याने सामाजिक बांधिलकी जपली आहे. राज्यावर आलेल्या दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीत एसटीने नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात राहता यावे यासाठी एसटीने पुढाकार घेत प्रवासात सवलती दिल्या आहेत़ 

सोलापूर विभाग कात टाकतोय...- ७१ वा वर्धापन दिन साजरा करीत असताना राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाने विविध स्तरावर लौकिकपूर्ण कामगिरी केली आहे़ सध्या विभागात पंढरपूर येथील चंद्रभागा स्टँडवर नव्याने बसस्थानक उभारणीचे काम सुरू आहे. सोलापूर बसस्थानकाचे संपूर्ण काँक्रिटीकरण केले, एमआयडीसी येथे १४ कोटी रुपये खर्चून नव्याने विभागीय कार्यशाळा उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे़ विभागात नव्याने साध्या गाड्यांसह शिवशाही बसदेखील दाखल झाल्याची माहितीही रमाकांत गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

आषाढीपूर्वी १०० बस - सोलापूर विभागात आतापर्यंत साध्या गाड्यांसह शिवशाही बस दाखल झाल्या आहेत. त्या विविध महत्त्वाच्या मार्गांवर धावत आहेत़ पंढरपूर येथे होणारी आषाढी वारी काही दिवसांवर आली आहे़ या आषाढी वारीत वारकºयांना तत्पर, जलद व सुरक्षित सेवा पुरविण्यावर भर देण्यात येणार असून, आषाढीपूर्वी १०० बस विभागात दाखल होतील, अशीही माहिती गायकवाड यांनी दिली.

प्रवासी वाढले..- राज्यातील कोट्यवधी प्रवाशांची लोकवाहिनी ठरलेल्या एसटीसमोर आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात स्पर्धा वाढली़ या स्पर्धेच्या युगात खासगी प्रवासी गाड्यांनी प्रवाशांना विविध सेवासुविधा पुरविण्यावर भर देऊन प्रवासी खेचण्याचा प्रयत्न केला मात्र याला तोंड देत राज्य परिवहन महामंडळाने खासगीपेक्षा अधिक सेवासुविधा प्रवाशांना देण्यावर भर दिला़ यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी प्रवाशांची संख्या अधिक वेगाने वाढली़ 

टॅग्स :SolapurसोलापूरST Strikeएसटी संपDiwakar Raoteदिवाकर रावते