शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

माढ्यात डेंग्यूसदृश आजाराचा फैलाव; पिता-पुत्रासह तिघांना झाली लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 14:16 IST

सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सुस्त : रुग्णांवर खासगी रुग्णालयांत उपचार सुरू

ठळक मुद्देमाढ्यात पिता-पुत्रासह तिघांना डेंग्यूसदृश आजाराची लागणसोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू नगरपालिका प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा जागी झालेली दिसून येत नाही

माढा : माढ्यात पिता-पुत्रासह तिघांना डेंग्यूसदृश आजाराची लागण झाली आहे़ त्यांच्यावर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले जाते़ या घटनेनंतरही नगरपालिका प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा जागी झालेली दिसून येत नाही.

संतोष प्रतापराव साठे व त्यांचा मुलगा सोहम संतोष साठे असे डेंग्यूसदृश आजाराची लागण झालेल्या पिता-पुत्राचे नाव आहे़ तसेच उपळाई बुद्रुक येथील रमेश बंड यांना डेंग्यूसदृश आजार झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे. साठे कुटुंबातील या दोघांना सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात हलविले आहे़ रमेश बंड यांना बार्शी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  मागील आठवड्यात संतोष       साठे यांचा मोठा मुलगा सूरज यालाही डेंग्यूसदृश आजार झाला होता़ त्याच्यावर उपचार करण्यात आले़ त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. 

नगरपंचायत व ग्रामपंचायतीच्या वतीने लोकवस्तीच्या ठिकाणी फवारणी करण्यात यावी. परिसरातील गटारीत पावसाचे पाणी साठते आहे़ परिणामत: आजाराची लक्षणे अनेकांमध्ये दिसत आहेत.

माढ्यातील संतोष साठे व सोहम साठे यांना मंंगळवार, ३ सप्टेंबर रोजी ताप व डोकेदुखीचा त्रास होऊ लागल्याने माढ्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते.  त्यावेळी दोघे डेंग्यूसदृश लक्षणे दिसताच चाचणी केली गेली़ चाचणीच्या अहवालावरुन त्यांना डेंग्यूसदृश आजार असल्याचे सांगितले गेले़ दोघांना पुढील उपचारासाठी सोलापुरात हलवण्यात आले.

सोहम व संतोष साठे या दोघांना डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याची माहिती पुढे आली असून याबाबत वरिष्ठांना कळविले आहे़ त्यांच्या कुटुंबीयांचे रक्ताचे नमुने घेऊन तपासणी करणार आहोत़ परिसरातील नागरिकांनी स्वच्छता घ्यावी, आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे़ - डॉ. नंदकुमार घोळवेवैद्यकीय अधिकारी, माढा ग्रामीण रुग्णालय

टॅग्स :Solapurसोलापूरdengueडेंग्यूhospitalहॉस्पिटलSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदHealthआरोग्यMedicalवैद्यकीय