शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

On The Spot; अवघ्या बारा तासात उभारला गेला १७० फुटी लोखंडी पूल; चार क्रेनमधून ४५ फूट उंचावर स्थिरावला ८० टनी सांगाडा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 12:44 IST

काशिनाथ वाघमारे सोलापूर : मागील पाच वर्षांत ३३ जणांचा बळी घेणाºया सोलापूर -पुणे महामार्गावर मडकीवस्तीजवळ गणेशनगर-वारदनगर यांना जोडणारा शहरातील ...

ठळक मुद्देअडीच वर्षांच्या पाठपुराव्यानंतर राष्ट्रीय महामार्गाने हाती घेतले काम आॅन दि स्पॉट रिपोर्ट : जुना पुणे नाका ते बाळेपर्यंत ट्रॅफिक जाम;  पूल उभारत असताना अपघात होऊ नये म्हणून प्रारंभी एका भागावरची वाहतूक बंद

काशिनाथ वाघमारे

सोलापूर : मागील पाच वर्षांत ३३ जणांचा बळी घेणाºया सोलापूर-पुणे महामार्गावर मडकीवस्तीजवळ गणेशनगर-वारदनगर यांना जोडणारा शहरातील पहिला पादचारी पूल उभारण्याचे काम राष्ट्रीय महामार्गाने मंगळवारी हाती घेतले़ दिवसभरातील १२ तासात जमिनीपासून ४५ फूट उंचीवर ८० टनाचा हा पूल उभारला गेला.

येत्या सात दिवसांत हा पूल पादचाºयांसाठी खुला केला जाणार आहे. सकाळी १० वाजता  लोखंडी पूल उभारणीच्या कामाला सुरुवात झाली़ चार मोठे क्रेन आणि मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाच्या मदतीने पूल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले़ तत्पूर्वी पुणे नाका चौकातून वाहतूक अन्य मार्गावरुन वळवण्यात आली़ या चौकात वाहतूक पोलीस तैनात होते़ पुलावर वाहनांची लांबलचक लागलेली रांग निदर्शनास आली.

गेल्या काही दिवसांपासून रस्ता पार करताना अनेकांना अपघाताचा अनुभव घ्यावा लागला़ दोन्ही नगरातून ये-जा करणाºया नागरिकांना जीव मुठीत धरुन रस्ता पार करावा लागत आहे.

 आंदोलन, मोर्चानंतर राष्ट्रीय महामार्गाने या रस्त्यावर गणेशनगर-वारदनगरला जोडण्यासाठी लोखंडी पादचारी पूल उभाण्याचा निर्णय घेतला़ पुणे-सोलापूर रोड डेव्हलपमेंट कंपनीने हे काम स्वीकारले़ आज सकाळी सुुरु झालेले काम दुपारी अडीच वाजता थांबले़ या साडेसहा तासांत पुलाचे अर्धे काम झाले़ रहदारीची समस्या लक्षात घेता उर्वरित अर्धे काम सायंकाळी चार वाजता सुरू करण्यात आले. रात्री ८.३० वाजता हे काम संपले. आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी आणि ज्योती बमगोंडे आदी नगरसेवकांची याठिकाणी उपस्थिती होती.

१७० फूट लांबीचा ८० टन ब्रीज- हा लोखंडी पूल उभारण्यासाठी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्यासह चारही नगरसेवकांनी यापूर्वी आंदोलने केली होती़ रास्ता रोको, मोर्चेनंतर पोलीस आयुक्तांनी दोन वेळा तर राष्ट्रीय महामार्गने चार वेळा बैठक घेतली़ तीन वेळा या ठिकाणी अधिकाºयांनी भेटी दिली़ जमिनीपासून ४५ फुट उंचीवर ८० टन वजनाचा आणि १७० फूट लांबीचा पूल उभारला जात आहे.

दहावी, बारावीच्या परीक्षार्थींना केले मार्गस्थ - सकाळी दहा वाजता वाहतूक संथ गतीने सुरु होती़ याचवेळी जड वाहतुकीमुळे दोन्हीकडची वाहतूक थांबली़ अशातच एका रिक्षातून दहावी आणि बारावीची परीक्षा द्यायला निघालेल्या विद्यार्थ्यांना रस्ता मोकळा होत नसल्याने तोंड काळवंडले़ चिंतातूर मुद्रा पाहता काही नागरिकांनी आणि प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी स्वत:च्या दुचाकीवरुन पुणे नाक्यावर सोडले़ कोणीतरी गर्दीतून बाहेर काढून परीक्षा केंद्रापर्यंत सोडण्यास मदत करतंय हे पाहून हे परीक्षार्थींच्या चेहºयावर हसू उमलले.

वाहतूक थांबवली- पूल उभारत असताना अपघात होऊ नये म्हणून प्रारंभी एका भागावरची वाहतूक बंद करण्यात आली़ दुसºया बाजूला एकेरी पद्धतीने वाहतूक सुरु ठेवण्यात आली़ सकाळी ८़३० वाजता सुरु केलेल्या पुलाचे काम रात्री ८़३० वाजता थांबवले गेले़ 

टॅग्स :Solapurसोलापूरhighwayमहामार्ग