शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

पोळा सण विशेष; शेतकरी सायेब झाला, बैलबारदाना गुंडाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 12:50 IST

शेतीचे यांत्रिकीकरण: पशुधनाकडे दुर्लक्ष; पाऊस नसल्याने पोळा सणाच्या हौसेला मर्यादा

ठळक मुद्दे बैलपोळा सणाचा व्यवसाय हा ७५ टक्के कमी झाला बैलपोळ्याच्या सणाला आज औपचारिकतेचे स्वरूप आले

बाळासाहेब बोचरेसोलापूर: शेतकºयांची मुलं शिकली, सायेब झाली किंवा शेती सोडून बैलबारदाना गुंडाळून शहराकडे गेल्याने बैलपोळ्याच्या सणाला आज औपचारिकतेचे स्वरूप आले असल्याचे चित्र आहे. 

एक जमाना होता. जमीन नसली तरी शेतमजूर म्हणून काम करणाºयाकडे घरटी एकतरी जनावर असायचं. पण आज मोठ्या शेतकºयाला जनावरं सांभाळण्यासाठी मजूर मिळेनात तर छोट्या शेतकºयाला अन् मजुराला बैलबारदाना सांभाळणे परवडेनासे झाल्याने पशुधनातच घट झाल्याचे दिसून येते. बैलपोळ्याचा सण म्हणजे आपल्या शेतात वर्षभर राबणाºया बैलांना मनोभावे सजवून त्यांची पूजा करताना शेतकºयाला मनस्वी आनंद व्हायचा. आज मात्र केवळ दुभत्या गायीला पोसण्याइतपत शेतकºयांचे जनावरांबद्दलचे प्रेम उरले आहे. 

बैलपोळा सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात फेरफटका मारला असता. बैलपोळा सणाचा व्यवसाय हा ७५ टक्के कमी झाला असल्याची प्रतिक्रिया या व्यवसायात ४० वर्षे असलेले शाम खंडेलवाल यांनी सांगितले. याच व्यवसायात टिकून असलेल्या साखरे यांच्या तिसºया पिढीतील योगेश साखरे सांगतात की, आम्ही लहान असताना बैलपोळा सणाच्या अगोदर १५ दिवस शेतकºयांची इतकी गर्दी असायची की आमच्याशी बोलायलाही आजोबांना वेळ नसायचा. आज मात्र १० टक्केही व्यवसाय नसल्याचे चित्र आहे. 

दरम्यान, दुकानात बैलांचे साहित्य खरेदी करण्यासाठी आलेले डोणगाव (ता. उत्तर सोलापूर) येथील शेतकरी राजाराम नारायण गायकवाड म्हणाले, आमच्याकडे कायम ४० ते ५० जनावरे असायची. पण आता जनावरे सांभाळण्यासाठी मजूर मिळेनात, शिवाय ट्रॅक्टर आल्याने जनावरे कमी केली. सध्या शेतकºयाची अवस्था वाईट आहे. पाऊस नाही, पिकाला भाव नाही आणि जो ऊस गेला त्याचे अजून पैसे मिळाले नसल्याने व्याजावर प्रपंच चालवण्याची वेळ आली आहे.

आमची पिढी आहे तोपर्यंत जनावरे आहेत. यापुढची शिकलेली पिढी जनावरे पाळेल की नाही, याबद्दल शंकाच आहे, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. थोडीफार शिकलेली शेतकºयांची मुलेही शेतात काम करणे आणि जनावरांची देखभाल करण्यापेक्षा शहरात कारखान्यात काम करण्याकडे वळू लागली आहेत. शिवाय उच्चशिक्षित मुले मोठ्या हुद्यावर गेली आहेत. आम्हाला देशी गायींच्या दुधाशिवाय दुसरं दूध आवडत नाही म्हणून खिलार गायी पाळल्यात. सगळी मिळून १२ जनावरे असल्याचे त्यांनी सांगितले. 

पैसा नाही, हौस कसली?च्पाऊसपाणी नसल्याने सध्या शेतकरी हवालदिल झाला आहे. साखर कारखान्यांकडे शेतकºयांची दीडशे कोटीची येणे बाकी असताना कारखान्यांनी पोळ्यासाठी काहीच जाहीर केले नाही.  त्यामुळे गरजेपुरतेच साहित्य घेतले जात आहे. हौसेला मुरड घातली जात आहे. बैलांच्या गळ्यातील चंगाळी ही उत्तम पितळी धातूपासून बनविली जाते. त्याची जोड किमान तीन ते साडेतीन हजाराला मिळते. पण चायना घुंगराची नवीन चंगाळी केवळ ५०० रुपयात मिळते. त्यामुळे काटकसरीने पोळा करण्याशिवाय गत्यंतर नाही.  

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी