शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण सोलापुरात ३०० रॅपिड टेस्ट मध्ये २८ जण आढळले पॉझिटिव्ह...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 12:39 IST

 गुरुवारी एकाच दिवसात २०० चाचण्याचे नियोजन; पळून गेलेला ‘तो' रुग्ण सिव्हिलमध्ये हलविला

ठळक मुद्देगेल्या तीन दिवसात रॅपिड एंटीजन किटद्वारे ३०० चाचण्या केल्या गुरुवारी एकाच दिवसात दोनशे चाचण्या घेण्याचे नियोजन करण्यात आले आहेभंडारकवठे येथे मंगळवारी आठ जण पॉझिटिव्ह आढळले

सोलापूर: जिल्ह्यात कोरोना संसर्गामध्ये टॉपर असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यात गेल्या तीन दिवसात रॅपिड एंटीजन किटद्वारे ३०० चाचण्या केल्या असून यामध्ये २८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डी. व्ही. गायकवाड यांनी दिली.

जिल्हा आरोग्य विभागाकडे उपलब्ध झाले आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी उपलब्ध केले आहेत. या कीटनुसार दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी, बोरामणी, वळसंग, मंद्रूप, भंडारकवठे, कंदलगाव, येळेगाव येथे चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये भंडारकवठे, येळेगाव, बोरामणी,  वळसंग, कुंभारी परिसरात २८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. रुग्णाच्या संपर्कातील व्यक्ती, त्याचबरोबर सर्वेक्षणात आढळलेल्या इतर आजारांच्या ज्येष्ठ व्यक्ती आणि रुग्णालयात येऊन गेलेले ज्यांना सर्दी खोकल्याचा त्रास आहे अशा रुग्णांची यादी करून ही टेस्ट घेतली जात आहे.

 गुरुवारी एकाच दिवसात दोनशे चाचण्या घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.  तो रुग्ण ‘सिव्हील’मध्ये भंडारकवठे येथे मंगळवारी आठ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत यात एकाच कुटुंबातील सहा जणांना धर्मवीर संभाजी तलावाजवळील केटरिंग कॉलेजच्या ओल्ड सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल केले असता यातील एक व्यक्ती बुधवारी सकाळी पावणेआठ वाजता कर्मचाºयांना धक्काबुक्की करून पळून गेला होता.

कर्मचाºयांनी नेहरूनगरपर्यंत पाटला केल्यावर त्याने दगडफेक केली होती. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दुपारी मंद्रूप पोलिसांना तो गाव तलावाजवळ आढळला. मंद्रुप पोलिसांनी त्याला सरकारी अँब्युलन्समधून पुन्हा कोविड सेंटरमध्ये दाखल केले, त्याची मानसिक स्थिती नीट नसल्याने पुढील उपचारासाठी गुरुवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आल्याचे डॉ. गायकवाड यांनी सांगितले़

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य