शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

भाजपच्या काही नेत्यांनी काँग्रेसला मतदान केले, सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट

By राकेश कदम | Updated: July 7, 2024 19:46 IST

Sushil Kumar Shinde : काँग्रेसच्या वतीने रविवारी अक्कलकोट रोड येथील एका मंगल कार्यालयात कृतज्ञता मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. 

सोलापूर : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या काही नेत्यांनी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांना मतदान केले. पण आम्ही या नेत्यांचे नाव घेणार नाही, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी रविवारी केला. काँग्रेसच्या वतीने रविवारी अक्कलकोट रोड येथील एका मंगल कार्यालयात कृतज्ञता मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. 

शिंदे म्हणाले, मी आजवर ९ ते १० निवडणुका लढविल्या. यंदाची निवडणूक आमच्या दृष्टीने खूप सोपी होती. मला सर्वांत कमी त्रास या निवडणुकीत झाला. विरोधी पक्षाचे लोक निवडणुकीत पैसे वाटप करीत असल्याच्या तक्रारी आमच्यापर्यंत आल्या. मात्र आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले. आम्ही त्यांची पर्वा केली नाही. कारण जनता आमच्या सोबत होती. काँग्रेसला सहकार्य करणाऱ्या भाजप नेत्यांनी नावे घेणार नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसचे काही लोक तिकडे गेले - प्रणिती शिंदेखासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, अनेक लोकांना या निवडणुकीत त्रास सहन करावा लागला. काही लोकं मॅनेज होऊन त्यांच्याकडे गेल्याच्या गोष्टी देखील कानावर आल्या. पण आम्ही दुर्लक्ष केले. लोकसभेचा पॅटर्न वेगळा असतो आणि विधानसभेचा वेगळा. ही गोष्ट लक्षात घ्या, असा सल्लाही त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला.

टॅग्स :Sushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेcongressकाँग्रेसSolapurसोलापूर