शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

अन्याय व चुकीच्या पध्दतीने वेतन मिळणाºया सोलापूर विभागातील सत्तावीस डाकसेवकांना मिळणार नियमानुसार वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 10:39 IST

सहा वर्षांपूर्वी नियुक्ती आणि वेतन चुकीच्या पद्धतीने निश्चित केले गेल्यामुळे अन्याय झालेल्या सोलापूर विभागातील २७ ग्रामीण डाकसेवकांना अखेर न्याय मिळाला आहे़

ठळक मुद्दे मागील चार वर्षांपासून त्यांनी ग्रामीण डाकसेवक संघटनेच्या माध्यमातून लढा डाकसेवकांनी संघटनेच्या माध्यमातून पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला़कमीत कमी ७५ हजार ते जास्तीत जास्त पावणेदोन लाखांचा फरक

काशिनाथ वाघमारेसोलापूर दि १२  : सहा वर्षांपूर्वी नियुक्ती आणि वेतन चुकीच्या पद्धतीने निश्चित केले गेल्यामुळे अन्याय झालेल्या सोलापूर विभागातील २७ ग्रामीण डाकसेवकांना अखेर न्याय मिळाला आहे़ त्यांना आता नियमानुसार वेतन मिळणार आहे. मागील चार वर्षांपासून त्यांनी ग्रामीण डाकसेवक संघटनेच्या माध्यमातून लढा चालू ठेवला आणि अखेर दिल्ली जनरल पोस्टचे डीजी अधिकाºयांनी संबंधित डाकसेवकांच्या नियुक्ती आणि वेतनात सुधारणा करून फरक अदा करण्याचे आदेश दिले़ २०१० साली सोलापूरसह सबंध महाराष्ट्रात ग्रामीण डाकसेवकांची भरती झाली होती़ या भरती प्रक्रियेत या उमेदवारांना किमान वेतन की तास? (मिनिमम स्केल की तास) असा गोंधळ करून नियुक्ती आणि वेतन दिले होते़ २०१२ साली या चुका काहींच्या लक्षात आल्या़ त्यानंतर या डाकसेवकांनी संघटनेच्या माध्यमातून पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला़ २००६ नंतर ज्या डाकसेवकांच्या नियुक्त्या झाल्या. त्यांना निश्चित केलेले किमान वेतन आणि किमान तास  देण्याचा आदेश राज्यातील सर्व जिल्ह्यांना काढण्यात आला होता; तो दिला जात नव्हता. यामध्ये सोलापूर विभागातील या २७ डाकसेवकांचा समावेश होता. शासनाने निश्चित केलेल्या किमान वेतन व तासाप्रमाणे त्यांना मेहनताना मिळत नव्हता. या डाकसेवकांनी ग्रामीण डाकसेवक संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा चालविला आणि २५ सप्टेंबर रोजी आमरण उपोषणही केले होते़ त्यावरून फरकासह दुरुस्त पगार अदा करण्याचे आदेश प्रवर अधीक्षकांकडून वरिष्ठ डाकपालला दिले गेले़ सप्टेंबर २०१७ मध्ये या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशीही झाली होती़ आता त्यांना न्याय मिळाला आहे.------------------यांच्यावर झाला होता अन्याय...- नीता मस्के (तिºहे, ता़ उत्तर सोलापूर),  गणेश कारमकर (अनगर, ता़ मोहोळ), पंकज कांबळे (कामती खुर्द, ता़ मोहोळ),अमोल शिंदे (तडवळे, ता़ बार्शी), छाया कांबळे (मोहोळ), अंजली घोळवे (गौडगाव, ता़ बार्शी), तायप्पा जाधव (अकोलेकाटी, उत्तर सोलापूर), प्रकाश शिंदे (मंद्रुप, ता़ दक्षिण सोलापूर), श्रीनिवास चव्हाण (धोत्री, ता़ दक्षिण सोलापूर), मीनाक्षी माने (सदर बझार पोस्ट कार्यालय, सोलापूर), ऋषी मडीखांबे (अक्कलकोट), पी़ एऩ कुंभार (तुळशीदास नगर, दहिटणे, बार्शी), लक्ष्मण कोल्हाळ (एकुरके, ता़ मोहोळ), निलेश आदलिंगे (यावली, ता़ बार्शी), संजय मनुरे (वळसंग, ता़ दक्षिण सोलापूर), सतीश मणियार (पाकणी, ता़ उत्तर सोलापूर), लक्ष्मण काळे (गुळपोळी, ता़ बार्शी), विश्वास ढमढेरे (सावळेश्वर, ता़ मोहोळ), अशोक परळकर (चारे, ता़ बार्शी),* सुहास देशमुख (उक्कडगाव, ता़ बार्शी), धनश्री चव्हाण (येरले, ता़ वैराग), सुचिता साखरे (मसलेचौधरी, ता़ मोहोळ), सारंग देशमुख (कारंबा, ता़ उत्तर सोलापूर), मेघा कराड (पानगाव, ता़ बार्शी), एम़ ए़ थोरात (वैराग, ता़ बार्शी),  सुनील उकिरडे (शेंद्री, ता़ बार्शी) ---------------काय झाली होती चूक? - एखादी रिक्त जागा आहे, त्या ठिकाणी नवीन ग्रामीण डाकसेवक भरला तर पूर्वीच्या ग्रामीण डाकसेवकाच्या कामाचे पाच तास असतील तर त्या पाच तासांचे किमान वेतन देण्याऐवजी तीन तासांचा मिनिमम स्केल दिला़ - परिणामत: टीआरसीए (वेतन) पाच तासांऐवजी तीन तासांचा दिला़ -२००९ नंतर आजपर्यंत कमी पगार घ्यावा लागला़ च्मिनिमम स्केल की मिनिमम तास हेच अधिकाºयांना कळले नाही़ -------------------संघटनेने रेटा लावून धरल्यानंतर सहा वर्षांनंतर चुकीची दुरुस्ती झाली़ २७ ग्रामीण डाकसेवकांना कमीत कमी ७५ हजार ते जास्तीत जास्त पावणेदोन लाखांचा फरक त्यांच्या निदर्शनास आणून दिला आणि तो देण्यास भागही पाडला़ - राजकुमार आतकरे, सचिव, ग्रामीण डाकसेवक संघटना

टॅग्स :Solapurसोलापूर