शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
2
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
3
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
4
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
5
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
6
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
7
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
8
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
9
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
10
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
11
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
12
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
13
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
14
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
15
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
16
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
17
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
18
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
19
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
20
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण

सोलापूरच्या गणेशमूर्तीची पेणला मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 12:59 PM

सोलापूर दि २३ : महाराष्टÑात पेणचा गणपती प्रसिद्ध आहे. घरी प्रतिष्ठापना करण्यासाठी दोन फुटापर्यंतच्या मूर्ती तेथे तयार होतात. राज्यभर गणेश मूर्तीची मागणी असलेल्या पेणमधून सोलापूरच्या गणपतीला दरवर्षी मागणी असते. पूर्व भागातील मूर्तिकार जनार्दन शेट्टी यांच्या मूर्ती गेल्या आठ वर्षांपासून पेणला नित्यनियमाने जातात.

ठळक मुद्देगणपतींची वर्षभर आधी मागणी नोंदविली जातेराज्यभर गणेश मूर्तीची मागणी

 

महेश कुलकर्णी : लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : महाराष्टÑात पेणचा गणपती प्रसिद्ध आहे. घरी प्रतिष्ठापना करण्यासाठी दोन फुटापर्यंतच्या मूर्ती तेथे तयार होतात. राज्यभर गणेश मूर्तीची मागणी असलेल्या पेणमधून सोलापूरच्या गणपतीला दरवर्षी मागणी असते. पूर्व भागातील मूर्तिकार जनार्दन शेट्टी यांच्या मूर्ती गेल्या आठ वर्षांपासून पेणला नित्यनियमाने जातात.रायगड जिल्ह्यातील पेण हे गाव गणेश मूर्ती बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे घरोघरी मूर्ती बनविण्याचे काम होते. कमी उंची असलेल्या आणि घरोघरी प्रतिष्ठापना करून पूजा करण्यात येणाºया मूर्ती पेणला बनतात. त्याहीपेक्षा रेखीव आणि सुरेख मूर्ती सोलापुरात शेट्टी कुटुंबाकडे बनविल्या जात असल्यामुळे ही मागणी असते. तेथे निर्यात केलेल्या मूर्ती मुंबईला विक्री करण्यात येतात. ६० वर्षांपासून जनार्दन शेट्टी या क्षेत्रात आहेत. सोलापुरातील आद्यमूर्तिकार शिवाजी गाजूल यांच्याकडून ही कला आत्मसात केलेल्या शेट्टी यांचे अख्खे कुटुंब हे काम करते. सुबक, आकर्षक आणि रेखीव अशा मूर्ती येथे बनण्याचे कारण म्हणजे वर्षभर हे काम चालत असते. अनेक मूर्तिकार गणपती उत्सवाच्या आधी काही महिने हे काम सुरू करतात. परंतु जगन्नाथ शेट्टी कुटुंबातील जवळपास १३ सदस्य वर्षभर हे काम करतात. मुलगा रघुनाथ, गिरीश आपल्या पत्नी आणि मुुलासह हे काम करीत असल्यामुळे दर्जाच्या बाबतीत कुठलीही तडजोड केली जात नाही.पुणे आणि मुंबईच्या भक्तांची दगडूशेठ आणि लालबागचा राजा या गणपतीवर श्रद्धा असल्याने  या मूर्तीसारखी प्रतिकृती असलेले गणपती शेट्टी यांच्याकडे तयार होतात. त्यांना पुणे आणि मुंबईहून मोठ्या प्रमाणात मागणी असते. वर्षभरात ९ हजार          गणेश मूर्ती शेट्टी कुटुंबीयांकडून            केल्या जातात. या सर्व गणपतींची वर्षभर आधी मागणी नोंदविली जाते. देवी आणि गौरीच्या मूर्तीही येथे बनतात.-------------------------२०० इको फ्रेंडली मूर्तीकर्नाटकातील बंगळुरूला शेट्टी यांच्या मूर्ती दरवर्षी जातात. कर्नाटक सरकारने प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी आणल्याने यावर्षी २०० इको फ्रेंडली मूर्ती त्यांनी बनवून दिल्या आहेत. शाडूपासून बनविलेल्या या मूर्तीला बनविण्यास वेळ लागतो.--------------------सुभाष गणपतीला मागणीघरगुती गणेश प्रतिष्ठापना करण्यासाठी शास्त्रशुद्ध मूर्ती बघून घेतल्या जातात. जनार्दन शेट्टी यांनी ४० वर्षांपूर्वी सुभाष (शुभ) गणपती तयार केलेला आहे. पिवळे पितांबर, भगवी शाल आणि उजवा पाय पुढे असलेल्या गणपतीला मोठी मागणी आहे. दरवर्षी अशा हजार मूर्तींची मागणी त्यांच्याकडे येत असते.