शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
3
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
4
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
5
सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
6
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
9
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
10
Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
11
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
12
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
13
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
14
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
15
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
16
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
17
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
18
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
19
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
20
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?

उजनीवर उभारणार सौरऊर्जा प्रकल्प! एक हजार मेगावॅटची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:58 IST

उजनी धरणातून सौर उर्जेद्वारे एक हजार मेगावॅट वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प चेन्नईच्या टेकफेडरल या कंपनीने सादर केला आहे. या संदर्भात मंत्रालयात नुकतेच सादरीकरण करण्यात आले.

- सिध्देश्वर शिंदेबेंबळे (जि. सोलापूर): उजनी धरणातून सौर उर्जेद्वारे एक हजार मेगावॅट वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प चेन्नईच्या टेकफेडरल या कंपनीने सादर केला आहे. या संदर्भात मंत्रालयात नुकतेच सादरीकरण करण्यात आले.राज्यातील मोठ्या जलप्रकल्पांमध्ये उजनी धरणाचे स्थान अग्रभागी आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता ११७ टीएमसी आहे. धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होते. ते रोखून त्यातून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प कंपनीने तयार केला आहे. जलाशयावर ५ एकराच्या परिसरात तरंगत्या स्वरुपात हा प्रकल्प असेल. जवळपास ६ हजार ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक टेकफेडरल कंपनीच्या वतीने करण्यात येणार आहे. गुंतवणुकीच्या बदल्यात तीन ते सव्वातीन रुपये दराने महाराष्ट्र शासनाने वीज खरेदी करावी, असा प्रस्ताव कंपनीने ठेवला आहे.तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पामधून वीजनिर्मितीबरोबर धरणातून होणारे बाष्पीभवन रोखले जाणार आहे. यामुळे मासेमारीला आणि पर्यटनाला कोणतीही अडचण येणार नाही, असा दावा कंपनीने केला आहे.पुढील टप्प्यात दोन हजार मेगावॅटचे लक्ष्यउजनीतील सौरऊर्जा प्रकल्प जलाशयाच्या मध्यभागी होणार आहे. यातून तीन महिन्याला शंभर मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे. पुढील टप्प्यात २ हजार मेगावॅटपर्यंत निर्मिती करण्याचे लक्ष्य कंपनीने ठेवले आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर