शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील वाळू लिलाव लवकरच होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 10:26 IST

हरित लवादाची भीती आणि खाणकाम आराखड्याच्या निर्णयामुळे रखडलेले वाळू लिलाव महिनाभरात पूर्ण होण्याची शक्यता 

ठळक मुद्दे५ हेक्टरच्या आतील ४१ वाळू गटांचा प्रस्ताव तयार जिल्ह्यात ९ लाख ब्रास वाळू उपलब्ध८ लाख ब्रास वाळूची मागणी शासकीय विभागांनी नोंदविली

सोलापूर : हरित लवादाची भीती आणि खाणकाम आराखड्याच्या निर्णयामुळे रखडलेले वाळू लिलाव महिनाभरात पूर्ण होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाकडून पाच हेक्टरच्या आतील ४१ पैकी दोन वाळू गटाचे लिलाव मार्चअखेर काढले जाणार आहेत. यासाठी प्रथम शासकीय विभागातील कंत्राटदारांना आणि नंतर खासगी व्यावसायिकांना प्राधान्य दिले जाणार आहे. 

जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांपासून प्रचंड वाळू टंचाई आहे. अवैध वाळू उद्योगाचा प्रश्नही ऐरणीवर आहे. यातून जिल्ह्यातील हजारो कोटींचे प्रकल्प अडचणीत आले आहेत. मागील आठवड्यात हा विषय ‘लोकमत’ने सविस्तरपणे मांडला होता. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अवैध खौणखनिज वाहतूक व उत्खनन नियंत्रण समितीची बैठक झाली. जिल्हा खनिकर्म अधिकारी भानुचंद्र कोलप्याक यांच्यासह पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीनंतर वाळू लिलाव लवकरच होतील, असे संकेत मिळत आहेत. 

जिल्हाधिकारी म्हणाले,  प्रशासनाने ५ हेक्टरच्या आतील ४१ वाळू गटांचा प्रस्ताव तयार केला आहे. जिल्ह्यात ९ लाख ब्रास वाळू उपलब्ध आहे. यातील ८ लाख ब्रास वाळूची मागणी शासकीय विभागांनी नोंदविली आहे. सध्या पंढरपूर तालुक्यातील दोन वाळू गटांचे खाणकाम आराखडे तयार करण्यात आले आहेत. बुधवारी होणाºया जिल्हास्तरीय बैठकीत या वाळू गटांच्या लिलावाचा निर्णय होईल. या लिलावात भाग घेण्यासाठी शासकीय प्रकल्पांची कामे घेतलेल्या कंत्राटदारांना संधी दिली जाईल. त्यांच्याकडून प्रतिसाद आला नाही तर खासगी व्यावसायिकांना संधी दिली जाईल. उर्वरित ३९ वाळू गटांचे खाणकाम आराखडे लवकरच पूर्ण होतील. हरित लवादाचे निर्देश आणि शासकीय नियमानुसारच वाळू उपसा करावा लागेल. 

शासकीय विभागांना विनालिलाव मिळणारच्शासकीय विभागांना विनालिलाव वाळू उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या विभागांनी जिल्हा प्रशासनाकडे आवश्यक असलेल्या वाळूची मागणी नोंदविली आहे. आता त्यांनी २७ मार्चपर्यंत पैसे भरायचे आहेत. येथून वाळू उपसा करण्याची जबाबदारी काम घेतलेल्या कंत्राटदारांवरच असेल. यासाठी त्यांना पास दिले जातील. येथून वाळू चोरी होऊ नये याची जबाबदारी कंत्राटदार आणि अधीक्षक अभियंत्यावरच असेल.  

वर्षभरात ४ कोटी ६८ लाखांचा दंडच्डॉ. भोसले म्हणाले, गेल्या वर्षभरात प्रशासनाने अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक प्रकरणी ४६० कारवाया केल्या आहेत. यातून ४ कोटी ६८ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला संयुक्तपणे कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी वेळापत्रक आखून कारवाई करायची आहे. 

सोलापूरनेच गतीने काम केले...च्शासनाने ३ जानेवारीला वाळू/रेती निर्गती धोरण जाहीर केले. यात प्रथमच वाळू गटाचा प्रस्ताव पर्यावरण विभागाकडे पाठविण्यापूर्वी संबंधित गटाचा खाणकाम आराखडा तयार करण्याचे आदेश शासनाने दिले. हे खाणकाम आराखडे तज्ज्ञ पर्यावरण सल्लागाराकडून करायचे आहेत.

जिल्हा प्रशासनाने जानेवारीमध्ये यासाठी निविदा काढली होती, परंतु प्रतिसादच मिळत नव्हता. अखेर जयपूर येथील तज्ज्ञ सल्लागाराकडून प्रथमत: दोन गटांचे आराखडे तयार करून घेण्यात आले. ते मंजुरीसाठी कोल्हापूरला उपसंचालकांकडे पाठविले. त्यालाही मंजुरी मिळाली. खाणकाम आराखड्याअभावी राज्यातील वाळू लिलाव रखडले आहेत. मात्र सोलापूर जिल्ह्याने राज्यात सर्वाधिक गतीने हे काम करून दाखविल्याचा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आणि जिल्हा खनिकर्म अधिकारी भानुचंद्र कोलप्याक यांनी व्यक्त केला.  

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय