शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरच्या परिवहन सेवेला येणार अच्छे दिन; केंद्राकडून ७० मिनी ई-बस अन् ३० अन्य बसेस मंजूर

By appasaheb.patil | Updated: July 13, 2024 13:15 IST

सोलापूर महानगरपालिकेची परिवहन व्यवस्था डबघाईला आली होती. गेल्या दहा वर्षात त्याची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत गेली.

सोलापूर : सोलापूर शहरातील सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेला अच्छे दिन आले असून नुकतीच एक गुड न्यूज सोलापूरकरांसाठी मिळाली आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या ताफ्यात आता नव्या ७० ई-बस व ३० नियमित आकाराच्या बसेस लवकरच दाखल होणार आहेत. केंद्र सरकारकडून तशा आशयाचे पत्र महानगरपालिकेला प्राप्त झाले आहे आणि महानगरपालिका परिवहन विभागाने सोलापूर विकास मंचला वरील माहिती पत्राद्वारे कळवली असल्याचे सोलापूर विकास मंचचे केतन शहा यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले. 

सोलापूर महानगरपालिकेची परिवहन व्यवस्था डबघाईला आली होती. गेल्या दहा वर्षात त्याची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत गेली. २००४ साली जवळपास दीडशे बसेस केंद्र सरकारकडून मिळाल्या होत्या, त्या उण्यापुऱ्या तीन महिने सुद्धा रस्त्यावर चालल्या नाहीत. आज त्या सर्व बसेस भंगार अवस्थेत पडून आहेत. केंद्र सरकारच्या निवास व शहरी विकास आणि पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालयमार्फत पंतप्रधान ई बस योजनेअंतर्गत सोलापूर शहराला नोव्हेंबर २०२३ मध्ये १०० ई बसेस मंजूर झाल्या होत्या. 

सोलापूर विकास मंचने सोलापूर शहरातील रस्त्यांची रुंदी, सलग सरळ रस्त्यांची लांबी, टर्निंग रेडियस, वळणं या सर्वांचा बारकाईने अभ्यास करून सोलापूर महानगरपालिकेचे शहर अभियंता, पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पंतप्रधान कार्यालय यांच्याशी पत्रव्यवहार करून सोलापूर शहरात लांबलचक ई-बस चालणार नाहीत, त्या ऐवजी मिडीबस उपयुक्त आहेत, अशी अभ्यासपूर्ण मांडणी केल्यानंतर केंद्राच्या कमिटीने खास सोलापूरसाठी ७० मिनी बस मंजूर केल्या व ३० नियमित आकाराच्या मोठ्या बसेस मंजूर केल्या आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूर