शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
5
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
6
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
7
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
8
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
9
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
10
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
11
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
12
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
13
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
14
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
15
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
16
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
18
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
19
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
20
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका

संगीत सुमिरनात लागली श्रोत्यांची समाधी, हिराचंद नेमचंद वाचनालयाचा वर्धापन दिनानिमित्त सोलापूर सुश्राव्य संगीत सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 13:57 IST

या संगीत सुमिरनात श्रोत्यांची समाधी लागली. एकाहून एक सरस अशा बंदिशी, भजन आणि शास्त्रीय गायनात श्रोते तल्लीन झाले. तब्बल अडीच तास चाललेल्या या तालासुराच्या वातावरणात श्रोते तल्लीन झाले.

ठळक मुद्देसुयोग कुंडलीकर यांची संकल्पना असलेल्या या संगीत सभेत आरती ठाकूर आणि डॉ. रेवती कामत यांचे गायनकिरवानीचे स्वर मनात रुंजी घालत असतानाच आरती ठाकूर यांनी चारुकेशी रागातील ‘सुमिरन बिन गोता खायेगा’ हा संत कबीरांचा मध्य लयीतील दोहा ऐकविला. संत रामदास आणि संत तुकारामांच्या भैरवीतील रचना सादर करून ‘माझे सर्व जावो, नाम तुझे राहो’ या भैरवीच्या स्वरांनी या मैफिलीची सांगता झाली. ‘विठ्ठल विठ्ठल, पांडुरंग विठ्ठल’ या गजराला श्रोत्यांनीही साथ दिली.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १७ : येथील हिराचंद नेमचंद वाचनालयाचा १६५ वा वर्धापन दिन  संगीत सभेने पार पडला. या संगीत सुमिरनात श्रोत्यांची समाधी लागली. एकाहून एक सरस अशा बंदिशी, भजन आणि शास्त्रीय गायनात श्रोते तल्लीन झाले. तब्बल अडीच तास चाललेल्या या तालासुराच्या वातावरणात श्रोते तल्लीन झाले.सुयोग कुंडलीकर यांची संकल्पना असलेल्या या संगीत सभेत आरती ठाकूर आणि डॉ. रेवती कामत यांचे गायन झाले. ‘परब्रह्म अनंतम् गणेशम् भजे’ या दृत लयीतील भजनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. दोन्ही गायिकांनी आपल्या कसदार आवाजात प्रारंभ केलेली ही मैफील उत्तरोत्तर खुलत गेली. या ईशस्तवनानंतर ‘नाद सूर भेद अपरंपार’ ही भैरव रागातील झपतालातील बंदिशी झाली. बंदिशीनंतर याच रागातील एकतालातील तराणा झाला. यातून दोन्ही गायिकांनी आपल्या शैलीदार गायनाचा प्रत्यय घडविला. लयकारी, आलाप यांचा संगम असलेल्या या बंदिशीतून भरत कामत यांच्या कसदार तबलावादनाचाही प्रत्यय रसिकांना आला. त्यानंतर रेवती कामत यांनी किरवानी रागातील ‘सुमिरन करो मोरे मन’ ही बंदिशी सादर केली. किरवानीचे स्वर मनात रुंजी घालत असतानाच आरती ठाकूर यांनी चारुकेशी रागातील ‘सुमिरन बिन गोता खायेगा’ हा संत कबीरांचा मध्य लयीतील दोहा ऐकविला. त्यानंतर दृत लयीतील चार बंदिशींची मेजवानी रसिकांना मिळाली. केदार, बागेश्री, कलावती आणि चंद्रकंस या रागातील बंदिशी आणि प्रत्येक रागानुरूप सुयोग कुंडलीकर यांच्या संवादिनीची मोहक साथ या टप्प्यात रंग भरून गेली. बहिणाबार्इंची ओवी आणि संत तुकारामांचा ‘आवडे हे रूप गोजीरे सगुण’ हा अभंगही अंतर्मनाला सुखावून गेला.बंदिशीनंतर मैफिलीला भजनांचा रंग चढला. प्रारंभी डॉ. रेवती कामत यांनी मारुबिहाग रागातील ‘करो रे मन श्यामरूप रसध्यान’ हे भजन सादर केले. केहरवा तालात रंगलेल्या या भजनाच्या शेवटच्या कडव्यानंतर ताल कायम राखत आरती ठाकूर यांनी पटदीप रागातील ‘मोहे लागी लगन गुरू चरणन की’ हे भजन सादर केले. ते संपताच रेवती कामत यांनी चंद्रकंस रागातील ‘राम गावा राम घ्यावा’ हे भजन ऐकविले. भजनांच्या या शुंखलेत शेवटी किरवानी रागातील ‘वेगी या हो मां भवानी’ या भजनातून आरती ठाकूर यांनी आर्त साद घातली. शेवटी संत रामदास आणि संत तुकारामांच्या भैरवीतील रचना सादर करून ‘माझे सर्व जावो, नाम तुझे राहो’ या भैरवीच्या स्वरांनी या मैफिलीची सांगता झाली. ‘विठ्ठल विठ्ठल, पांडुरंग विठ्ठल’ या गजराला श्रोत्यांनीही साथ दिली.प्रारंभी चारही कलावंतांचे वाचनालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला संगीत रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Solapurसोलापूर