शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरकरांनाही मिळणार कोरोना लस; पिनकोडवर ठरणार लसीकरणाचे बूथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 13:20 IST

आरोग्य विभागाची तयारी : फ्रंटलाईनच्या कर्मचाऱ्यांची होणार नोंद

ठळक मुद्देआरोग्य विभागानंतर आशा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लस देण्याचे नियोजन पोलीस, सफाई कर्मचारी व वर्तमान पत्रात काम करणाऱ्यांना संधी दिली जाणारलसीकरणानंतर संबंधिताला त्या केंद्रावर अर्धा तास थांबावे लागणार आहे

सोलापूर : कोरोना लसीकरणाची राज्यातील चार जिल्ह्यात रंगीत तालीम होणार असली तरी इतर सर्वत्र ठिकाणी लसीकरणाची तयारी जोरात सुरू आहे. लसीकरणासाठी ऑनलाईन नोंद केलेल्या कर्मचाऱ्यांच्या पत्त्यावरील पिनकोडवरून लसीकरणाचे बूथ निश्चित होणार आहेत.

आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार लसीकरण कार्यक्रमासाठी लागणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची मोहीम सध्या सुरू आहे. पहिल्या टप्प्यात सरकारी व खासगी आरोग्य सेवा देणारे डॉक्टर व कर्मचाऱ्यांना लस देण्याचे नियोजन आहे. याप्रमाणे सर्व संस्थांकडून संबंधित कर्मचारी डॉक्टरांची नावे आधार कार्डसह घेऊन ऑनलाईन नोंदण्यात आली आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांच्या पत्त्यावरील पिनकोडवरून बुथची मांडणी केली जाणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी सांगितले. त्याप्रमाणे नोंद केलेल्या कर्मचाऱ्यांना लसीकरणावेळेस मोबाईलवर बुथक्रमांकासह संदेश दिला जाईल. लसीकरणाला आल्यावर तीच व्यक्ती आहे की नाही, याची काटेकोरपणे तपासणी केली जाणार आहे.

बुथच्या रचनेत सुटसुटीतपणा

लसीकरणानंतर संबंधिताला त्या केंद्रावर अर्धा तास थांबावे लागणार आहे. त्यामुळे एका बूथवर दररोज शंभर लसीकरण करण्याचे नियोजन आहे. लसीकरणानंतर अर्धा तास वेटिंग करण्यासाठी खास कक्ष व अ‍ॅम्बुलन्स तयार ठेवाव्या लागणार आहेत. त्यामुळे या लसीकरणालाही मतदान केंद्राप्रमाणेच शाळांची निवड केली जाणार आहे.

फ्रंटलाईनवरील कर्मचारी

आरोग्य विभागानंतर आशा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लस देण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर कोरोना उपाययोजनेसाठी फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या पोलीस, सफाई कर्मचारी व वर्तमान पत्रात काम करणाऱ्यांना संधी दिली जाणार आहे. त्यानंतर ज्येष्ठ व्यक्तिंचा टप्पा असणार आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय