शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

सोलापूरकरांची एकच हाक; गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 20:48 IST

सोलापूर लोकमत विशेष...

सोलापूर : गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात सोलापूरकरांनी गणरायाला निरोप दिला. कोरोनाच्या निर्बंधांमुळे सोलापूरकरांनी घरातील कुंडातच आपल्या गणरायाचं विसर्जन केलं तर हजारो कुटुंबियांनी महापालिकेने निर्माण केलेल्या विसर्जन कुंडात विधिवत पूजा करून गणरायाला निरोप दिला.

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध उपाययोजना करण्यात आल्या असून सोलापूर शहरात विभागीय कार्यालय १ ते ८ यामध्ये एकूण १०० मूर्ती संकलन केंद्र करण्यात आले होते.

 सोलापूर शहरातील गणेश मूर्ती संकलन करण्यात येत होते, संकलन करण्यात आलेल्या गणेश मूर्तीचे विसर्जन सिद्धेश्वर तलाव येथील, गणपती घाट, हिप्परगा  येथील दगडीखान, रामलिंग नगर येथील विहीर, लक्ष्मी-विष्णू चाळीतील जुनी विहीर, अशोक चौक येथील मार्कंडे गार्डन येथील विहीर, निलम नगर येथील नवले विहीर आदी ठिकाणी सार्वजनिक व घरगुती गणेश मूर्तीच्या विसर्जन करण्यात आले. तुळजापूर रोड येथील खाणीमध्ये गणेश मूर्तीचे विधीवत  विसर्जन करण्यात आले. या ठिकाणी महापौर श्रीकांचना यन्नम व आयुक्त पी. शिवशंकर यांनी भेट देऊन पाहणी होती, त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते तुळजापूर रोड वरील खाण येथील सोलापूर शहरातील संकलन करण्यात आलेल्या श्रीगणेश मूर्तीचे पूजन केले होते. 

यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृहनेते शिवानंद पाटील, विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे, आयुक्त पी.शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, नगर अभियंता संदीप कारंजे, तसेच महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सोलापूर शहरवासियांना महापौरांनी आवाहन केले होते की, सर्व नागरिकांनी गणेश मूर्ती आपल्या घरातच विसर्जन करावे, शक्य नसल्यास महापालिकेच्या संकलन केंद्रावर ती गणेशमूर्ती सुपूर्त करावी आणि त्या सर्व मूर्ती महापालिकेच्या वतीने विसर्जन करण्यात येईल. यावेळी आयुक्त पी.शिवशंकर म्हणाले होते की, सोलापूर शहरातील एकूण 100 ठिकाणी गणेश विसर्जन करण्यासाठी संकलन केंद्र उभारण्यात आले आहेत. त्याठिकाणी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून सर्वप्रथम नागरिकांनी आपल्या घरातच गणेश विसर्जन करावं अथवा आपल्याला शक्य नसल्यास त्यांनी जवळच्या महापालिकेच्या संकलन केंद्रामध्ये गणेश मूर्ती सुपुर्द करावे ती विधिवत पूजा करून  महापालिकेच्यावतीने विसर्जन करण्यात येईल  तसेच नागरिकांनी घरीच राहून सुरक्षित राहावे आणि पर्यावरण पूरक श्रीगणेश विसर्जन करावे सर्व सोलापूकरानी महानगरपालिकेला सहकार्य करावे असे आव्हान पी.शिवशंकर यांनी केले.

यंदाच्या वर्षी पालिका प्रशासनाकडून गणेश मूर्तीच्या विसर्जन करण्याकरिता तयार करण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडाची व्यवस्था नेटक्या पद्धतीने केल्याचे सांगत सभागृहनेते शिवानंद पाटील यांनी पालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेचे कौतुक केले.पालिका प्रशासन, पोलिस यंत्रणा ,सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या सहकार्यामुळे नियोजनबद्ध पद्धतीने विसर्जन कुंडावर व्यवस्था करणे शक्य झाल्याची सांगताना पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी गणेशभक्त बरोबरच प्रशासकीय यंत्रणेचे कौतुक केले.

टॅग्स :SolapurसोलापूरGanesh Mahotsavगणेशोत्सवSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका