शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरकरांनो... सावधान कोरोनासोबत डेंग्यूचाही वाढतोय धोका; सर्वाधिक रुग्ण ग्रामीण भागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2022 16:52 IST

पाणी साचू न देण्याचे केले आवाहन

सोलापूर : कोरोना विषाणू संसर्गासोबत डेंग्यूच्याही संकटाला तोंड द्यावे लागत आहे. मागील तीन महिन्यांची परिस्थिती पाहिली तर डेंग्यूंच्या रुग्णांची संख्या कमी दिसत असली तरी डेंग्यूचा धोका अद्याप टळला नाही.

डेंग्यू, मलेरिया यांसारख्या रोगांना आळा बसावा व त्यांच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, यासाठी डासांची उत्पत्तीस्थाने शोधण्याच्या दृष्टीने घरांची व घरांच्या जवळपासच्या परिसराची तपासणी हिवताप कार्यालय व महापालिकेच्या कीटकनाशक खात्याद्वारे नियमितपणे करण्यात येत असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिवताप कार्यालयाद्वारे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

या तपासणीदरम्यान इमारत परिसरातील पाण्याच्या टाक्या, झोपडपट्ट्यांमधील पाण्याचे पिंप, प्लास्टिक किंवा ताडपत्रीमध्ये साचलेले पाणी, परिसरात पडून असले टायर व त्या टायरमध्ये साचलेले पाणी, झाडांच्या कुंड्यांखालील ताटल्या, शोभिवंत झाडांच्या कुंड्या, पाणी असणाऱ्या शोभेच्या वस्तू, नारळाच्या करवंट्या व त्यात साचलेले पाणी, फेकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्यामधील किंवा बाटल्यांच्या झाकणांमधील पाणी इत्यादींची तपासणी करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, सहायक जिल्हा हिवताप अधिकारी विजय बागल, महापालिकेतील जीवशास्त्रज्ञ पूजा नक्का यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे.

--------

मागील तीन महिन्यांतील शहरातील आकडेवारी

  • महिना नमुने घेतले डेंग्यू पॉझिटिव्ह
  • ऑक्टोबर २५० ८८
  • नोव्हेंबर १०७ ३०
  • डिसेंबर ५४ १२

----------------

 

ग्रामीण भागात रुग्णसंख्या कमी

सध्या पावसाळा नसला तरी काही ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होत आहे. शहरातील डेंग्यू रुग्णांशी तुलना करता ग्रामीण भागात रुग्णसंख्या कमी आहे. शहरात घरे जवळ-जवळ असणे, कमी जागेत जास्त लोक राहणे यामुळे आजाराचे प्रमाण जास्त दिसून येते. ग्रामीण भागात डिसेंबर २०२१ मध्ये ४९ जणांचे नमुने तपासणीसाठी घेतले. यातून १६ जणांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले.

..ही घ्या काळजी

  • - आपले घर व परिसर स्वच्छ ठेवा
  • - आठवड्यातून एक दिवस कोरोडा दिवस पाळा
  • - नियमित मच्छरदाणीचा वापर करा
  • - आपण वास्तव्य करीत असलेल्या परिसरात पाणी साचू देऊ नका
  • - ताप असल्यास त्वरित जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

------------

टॅग्स :Solapurसोलापूरdengueडेंग्यूHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल