शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सोलापूरकरांचे दातृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 11:58 IST

सर्वसामान्यांचेही योगदान : पश्चिम भागात जमा झाले २.६० लाख रुपये

ठळक मुद्देदिवसभरात २ लाख ५९ हजार ९७४ रुपये निधी जमानवी पेठमधील फुलविक्रेत्यांनी पूरग्रस्तांसाठी दिला निधी २ लाख ६० हजार रुपये जमा

सोलापूर : केरळमध्ये पुरामुळे निर्माण झालेल्या अस्मानी संकटाचा सामना करण्यासाठी सोलापूरकरांनी मोठे दातृत्व दाखवले. माकपतर्फे काढण्यात आलेल्या मदतफेरीला शहरातील छोटे-मोठे व्यापारी, फेरीवाले, पादचाºयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २ लाख ६० हजार रुपये जमा झाले.

सकाळी ११ वाजता शहापूर चाळ येथील शहीद अब्दुल रसूल कुर्बान हुसेन गृहनिर्माण संस्था कार्यालयापासून मदतफेरीला सुरुवात करण्यात आली. किडवाई चौक येथे फेरी आल्यानंतर रस्त्यावरच्या व्यापाºयांनी दहा, वीस रुपये दिले. यानंतर बेगमपेठ येथे फेरी गेली. दुकान, हॉटेल व्यावसायिकांनी ५०-१०० रुपये मदत दिली. माणिक चौक, मंगळवार पेठ, चाटी गल्ली अशा सर्व ठिकाणी रस्त्यांवरील पादचाºयांनी यथाशक्ती निधी दिला. नवी पेठमधील फुलविक्रेत्यांनी पूरग्रस्तांसाठी निधी दिला. यानंतर मेकॅनिक चौकातून छत्रपती शिवाजी चौकात मोहिमेचा समारोप करण्यात आला.

यावेळी नागरिक, कामगार, विद्यार्थी, फेरीवाले, छोटे-मोठे दुकानदार, व्यापारी, शासकीय व प्रशासकीय वर्गाकडून उत्स्फूर्त मदत मिळाली. १० रु़पासून ते २ हजार रुपयांपर्यंतची रक्कम मदत म्हणून सोलापूरकरांनी दिली. 

दिवसभरात २ लाख ५९ हजार ९७४ रुपये निधी जमा झाला. नैसर्गिक संकटाचा सामना करणाºया केरळवासीयांसाठी सुरू असलेला मदतीचा ओघ पाहून घरोघरी जाऊन निधी गोळा करण्याचा निर्णय पक्षाच्या वतीने घेण्यात आल्याची माहिती नरसय्या आडम यांनी दिली.

कपड्यांचे ५० जोड- पिकअप टेलर्सचे विजय गुळेद यांनी ५० जोड नवीन कपड्यांची जोडी मदत म्हणून माकप कार्यालयात येऊन दिले. हे कपडे तत्काळ रेल्वेद्वारे केरळकडे पाठवण्यात आले.

विविध सामाजिक संघटनांनी अशा प्रकारची मदतफेरी काढावी. नवीपेठमधील सर्व व्यापारी शक्य होईल तेवढी आर्थिक मदत करतील. पूरग्रस्तांंना दिलासा देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत.- कैलास उपाध्ये, व्यापारी, नवीपेठ.

भूकंप, महापूर अशा अस्मानी संकटाच्या वेळी नेहमीच सर्व भारतीय एकत्र येतात. सोलापूरकर याला अपवाद नाहीत. पूरग्रस्तांसाठी सढळ हाताने मदत केली.- डॉ. विश्वनाथ बिराजदार, पारस इस्टेट

नैसर्गिक संकट कुठेही आले तरी सर्वच जण मदत करीत असतात. किल्लारी आणि सास्तूरला भूकंप झाला असताना संपूर्ण जगाने मदत केली होती. अशीच मदत पूरग्रस्तांसाठी करीत आहोत.- कैलास बंडगर, रिक्षाचालक

टॅग्स :SolapurसोलापूरKeralaकेरळRainपाऊस