शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
4
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
5
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
6
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
7
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
8
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
9
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
10
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
11
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
12
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
13
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
14
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
15
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
16
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
17
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
18
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
19
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
20
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 

सत्यशोधक चळवळीची सोलापुरी नाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 12:02 IST

महात्मा ज्योतीबा फुले जयंती विशेष...!

ठळक मुद्देसत्यशोधक चळवळीतील कार्यकर्त्यांनी वैयक्तिक पातळीवर अथक प्रयत्न करून समाजाचा पाया ग्रामीण भागात विस्तारला पदे, पोवाडे, जलशे, कीर्तने, व्याख्याने आणि प्रबोधनपर साहित्यातून सत्यशोधक तत्त्वाचा प्रसार महात्मा ज्योतीबा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा व्यापक प्रभाव सोलापूर जिल्ह्यात आहे.

समाज सुधारण्याच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असणाºया प्रमुख जिल्ह्यांपैकी सोलापूर हा एक जिल्हा. मुळातच सोलापूरची मातीच चळवळीची असल्याने येथे अनेक चळवळी निर्माण झाल्या आहेत. महात्मा ज्योतीबा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा व्यापक प्रभाव सोलापूर जिल्ह्यात आहे.

सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्त्यांनी वैयक्तिक पातळीवर अथक प्रयत्न करून समाजाचा पाया ग्रामीण भागात विस्तारला. पदे, पोवाडे, जलशे, कीर्तने, व्याख्याने आणि प्रबोधनपर साहित्यातून सत्यशोधक तत्त्वाचा प्रसार केला. यामुळेच सोलापूर जिल्ह्यातही सत्यशोधक चळवळ सक्रिय झाली.

सोलापूर जिल्ह्यात वालचंद कोठारी, सोनोपंत कुलकर्णी, हरिभाऊ  तोरणे, धोंडिराम उबाळे, यशवंत कुलकर्णी, शामराव लिगाडे,श्रीपतराव नागणे, जयवंतराव मोरे वकील, बाळासाहेब सातपुते, भगवंतराव उबाळे हे सत्यशोधक विचाराने प्रभावित झालेले कार्यकर्ते होते. अकोला येथील आठव्या सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष वालचंद कोठारी यांचा जन्म बावी येथील आहे. सत्यशोधक मतांचा प्रचार करण्यासाठी त्यांनी १९ जुलै १९१७ रोजी ह्यजागरूकह्ण हे नियतकालिक सुरू केले. कोठारी हे निपाणी (बेळगाव) येथील सत्यशोधक समाजाच्या सहाव्या अधिवेशनाला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्यासमवेत उपस्थित होते. या अधिवेशनाला महात्मा गांधी यांचे एक व्याख्यान वा.रा. कोठारी यांनी आयोजित केले होते. या अधिवेशनात त्यांची सत्यशोधक समाजाचे प्रचारक म्हणून नेमणूक करण्यात आली होती . हरिभाऊ तोरणे हे सोलापूर जिल्ह्यातील मेडद गावातील तळमळीचे सत्यशोधक कार्यकर्ते होते. ते पेशाने शिक्षक, उत्तम वक्ते व सत्यशोधक कीर्तनकार होते. ह्यदीनमित्रह्ण पत्रात ह्यकाठीचे सपाटेह्ण  हे सदर काही दिवस चालवत होते . सत्यशोधक जलशासाठी त्यांनी ह्यचावडीतील बैठकह्ण ही संहिता लिहिली. ही संहिता ह. ल. चव्हाण यांनी कोल्हापूर येथून सन १९२३ ला प्रसिद्ध केली. हरिभाऊ तोरणे यांनी १९२० साली पंढरपूर येथे ह्यबहिष्कृत विद्यार्थी गृह ह्य सुरु केले.

१८फेब्रुवारी १९२३ ला पंढरपूर येथे ह्यबहिष्कृतबंधूह्णची जाहीर सभा सोनोपंत कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली घेतली. पुढे हरिभाऊ तोरणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाऊ लागले. सत्यशोधक शाहीर सोनोपंत कुलकर्णी मेडद या गावचे होते. सत्यशोधक हरिभाऊ तोरणे यांच्या संपर्कात आल्यानंतर सन १९११ च्या सुमारास ते सत्यशोधक चळवळीत सक्रिय झाले. पंढरपूर येथील चोखामेळा धर्मशाळेत बहिष्कृतांची जाहीर सभा संपन्न झाली. या सभेचे अध्यक्षस्थान सोनोपंतांनी भूषविले.  त्यांनी सत्यशोधक जलशांची बांधणी करून महाराष्ट्रभर मानवमुक्तीसाठी सत्यशोधक समाजाचा प्रचार जलशातून केला .

बार्शीतील कापड मिलमध्ये कामगार असणारे धोंडिराम उबाळे हे चिंचगाव, तालुका माढा येथील सत्यशोधक कार्यकर्ते होते . त्यांचे स्वत:चे वाचनालय होते . ते निरक्षर असल्याने आवडणाºया ग्रंथांचे दुसºयांकडून वाचन करून घेत. त्यांचे सत्यशोधक जेधे-जवळकर यांच्याशी घनिष्ठ संबंध होते. गावात आषाढ महिन्यात निघणाºया लक्ष्मीआईच्या यात्रेला त्यांचा विरोध असे. यामुळे त्यांच्यावर अनेक केसेस झाल्या होत्या. तरीही त्यांनी सत्यशोधक विचार प्रभावीपणे रुजवले.

सांगोला तालुक्यात सत्यशोधक चळवळ सक्रिय करण्याचे काम सत्यशोधक शामराव लिगाडे यांनी केले. ते १९२५ साली ह्यजिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष होते. याचवर्षी  सांगोला तालुक्यातील वाटंबरे  येथे ह्यसोलापूर जिल्हा ब्राह्मणेतर परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेस सत्यशोधक चळवळीचे नेते दिनकरराव जवळकर,  केशवराव बागडे हे उपस्थित होते. सन १९२६ साली कडलास व जवळा या ठिकाणी सत्यशोधक समाजाच्या परिषदा झाल्या होत्या.

या परिषदेला कोल्हापूरहून सत्यशोधक समाजाचे नेते बाबुराव यादव, कीर्तिवानराव निंबाळकर आदी मंडळी उपस्थित होती.    बार्शी तालुक्यातील कारी-नारी हे सत्यशोधक चळवळीचे महत्त्वाचे केंद्र होते.  या ठिकाणी चिकुर्डे गावचे कुलकर्णी यशवंत हे तलाठी म्हणून कार्य करीत होते. त्यांनी सत्यशोधक चळवळ या भागात मोठ्या प्रमाणात रुजवली. या भागात धार्मिक विधी सत्यशोधक विचारानेच केले जात होते .

श्रीपतराव नागणे(मंगळवेढा), जयवंतराव मोरे वकील (पंढरपूर), बाळासाहेब सातपुते (पाटकूल), भगवंतराव उबाळे (बार्शी) यांनी सत्यशोधक समाजाचा प्रसार मोठ्या प्रमाणात केला आहे. नातेपुते येथील मुरलीधर आबाजी क्षीरसागर हे ह्यदीनमित्रह्ण मध्ये  लेखन करीत होते. पाटकूल येथील सत्यशोधक झांबरे यांनी सत्यशोधक रात्रशाळा सुरू केली होती. एकंदरीत सोलापूर जिल्ह्यात सत्यशोधक चळवळ प्रभावीपणे कार्यरत होती.- प्रा. डॉ. तानाजी देशमुख(लेखक हे महात्मा फुले यांच्या साहित्याचे अभ्यासक आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणMahatma Phule Wadaमहात्मा फुले वाडा