शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी पाहुण्यांना सोलापुरी टॉवेलची भुरळ; एजंटांऐवजी आता थेट सोलापूरहून खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 12:31 IST

सोलापुरातील टेरी टॉवेल आंतरराष्ट्रीय प्रदर्शन; १०० हून अधिक परदेशी नागरिकांनी दिल्या भेटी

ठळक मुद्देहोटगी रोड येथील काडादी सांस्कृतिक भवनमध्ये व्हायब्रंट टेरीटॉवेल प्रदर्शन सुरु दोन दिवसांत सुमारे १०० परदेशी नागरिकांनी या प्रदर्शनास भेट दिलीपहिल्यांदाच अशा प्रकारचे प्रदर्शन पाहत असल्याचे चीनचे शानडाँग यांनी सांगितले

सोलापूर : आमच्या व्यवसायाकरिता लागणारे टॉवेल आम्ही नेहमी एखाद्या एजंटाच्या सल्ल्यानुसार घ्यायचो. टेरीटॉवेल प्रदर्शनाला आल्यानंतर यातही इतके सारे पर्याय असतात हे कळाले. यामुळे यापुढे टॉवेल खरेदीसाठी सोलापूर हा आमच्याकडे सर्वात चांगला पर्याय आहे, अशी प्रतिक्रिया प्रदर्शनाला भेट देणाºया परदेशी नागरिकांनी दिली.

होटगी रोड येथील काडादी सांस्कृतिक भवनमध्ये व्हायब्रंट टेरीटॉवेल प्रदर्शन सुरु आहे. या दोन दिवसांत सुमारे १०० परदेशी नागरिकांनी या प्रदर्शनास भेट दिली. येथे असणाºया विविध प्रकारच्या टॉवेलचे कौतुक करताना सोलापूर भविष्यात या क्षेत्रात मोठी प्रगती करेल, असा विश्वास या परदेशी नागरिकांना दिला. हॉटेल, रुग्णालय आदींसाठी टॉवेलची गरज पडत असते. आता टॉवेल हा फक्त टॉवेलच न राहता त्याचा बहुपयोग करता येतो. विविध प्रकारचे टॉवेल, त्यांची रंगसंगती ही अनेकांची डोळे दिपवणारी आहे. या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर खूूप नव्या कल्पना जाणून घेता आल्या. यापूर्वी टॉवेल खरेदीसाठी कारखान्यांना भेटी दिल्या. मात्र पहिल्यांदाच अशा प्रकारचे प्रदर्शन पाहत असल्याचे चीनचे शानडाँग यांनी सांगितले. 

या देशातील नागरिकांनी पाहिले प्रदर्शन- काडादी सांस्कृतिक भवनमध्ये व्हायब्रंट टेरीटॉवेल प्रदर्शन हे २७ सप्टेंबरपर्यंत सुरु असणार आहे. उद्घाटनापासून दोन दिवसात १०० हून अधिक परदेशी नागरिकांनी या प्रदर्शनास भेट दिली. या भेटीत व्यवसायासंबंधी चर्चाही करण्यात आल्या. दुबई, चीन, ओमान, कतार, श्रीलंका, अमेरिका, डेन्मार्क, जपान, जर्मनी, कॅनडा, आॅस्ट्रेलिया या देशातील व्यावसायिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली आहे. प्रदर्शनाचा अणखी एक दिवस शिल्लक असल्याने शेवटच्या दिवशी आणखी लोक या प्रदर्शनाला भेट देतील, अशी अपेक्षा टेरीटॉवेल प्रदर्शनाचे अध्यक्ष राजेश गोसकी यांनी व्यक्त केली.

यापूर्वी तीनवेळा मी सोलापूरला भेट दिली आहे. टॉवेल व इतर वस्तूंची खरेदी देखील केली. दिवसेंदिवस येथे तयार होणाºया टॉवेलच्या गुणवत्तेत सुधारणा होत आहे. या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात आंतरराष्ट्रीय दर्जाचे टॉवेल आहेत.- शानडाँग, चीनटॉवेलचे प्रदर्शन सोलापुरात भरविल्याने आम्हाला टॉवेल तर पाहता आलेच, सोबतच हे शहरही जाणून घेता आले. प्रत्यक्षात टॉवेलची  निर्मिती कशी होते हे जाणून घेण्यासाठी मी सोलापुरात आले आहे. या प्रदर्शनात असलेल्या यंत्रांचीही माहिती घेतली.- अँडी लिया, चीन

टॅग्स :SolapurसोलापूरTextile Industryवस्त्रोद्योगchinaचीनMarketबाजार