शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

अभिमानास्पद; सोलापुरी उद्योजक देणार जगाला डिजिटल मार्केटिंगचे धडे...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 12:53 IST

देश-विदेशातील २० हजार व्यापाºयांना मार्गदर्शन; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन आव्हानांचा  सामना

ठळक मुद्देडिजिटल मार्केटिंगमधून देश आणि विदेशातील व्यापाºयांना  कसे आकर्षित करता येईल आंतरराष्ट्रीय वेबिनार मार्गदर्शन करण्यासाठी भारतातून फक्त दोन उद्योजकांची निवड करण्यात आलीसंपूर्ण भारताच्या औद्योगिक व्यासपीठावर सोलापूरच्या डिजिटल मार्केटिंगची चर्चा या वेबिनारच्या माध्यमातून होणार

बाळकृष्ण दोड्डी सोलापूर : सामूहिकपणे डिजिटल मार्केटिंगचा फंडा अंमलात आणा. असे केल्यास मार्केटिंग खर्च वाचेल आणि जगभरातील व्यापारी त्वरित आकर्षित होतील. हा प्रयोग सोलापुरातील रेडिमेड गारमेंट असोसिएशनने अंमलात आणला. डिजिटल मार्केटिंगच्या संकल्पनेतून सोलापूरसारख्या थ्री टायर सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय गारमेंट प्रदर्शन भरविले आणि यास देशभरातील पंधरा हजारांहून अधिक तसेच जगभरातील शेकडो व्यापारी, एजंट, उद्योजक सहभागी झाले. प्रदर्शन खºया अर्थाने यशस्वी होऊन यातून जागतिक व्यापारी व्यासपीठ सोलापुरातील उद्योजकांना उपलब्ध झाली. सोलापुरी गारमेंट उद्योगातील डिजिटल मार्केटिंग फंडा आता जागतिक पातळीवर चर्चिला जाणार आहे.

सोलापुरातील प्रसिद्ध गारमेंट उद्योजक अमित जैन हे या विषयावर आंतरराष्ट्रीय कंपनी अलीबाबा डॉटकॉमच्या व्यासपीठावर अनुभव शेअर करणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अलीबाबा डॉटकॉम कंपनीने जगभरातील उद्योजकांना पुढील आव्हाने कसे असतील या विषयावर विचार मागवले. ‘अलीबाबा स्पीच’ या उपक्रमांतर्गत अमित जैन यांनी सोलापुरातील गारमेंट असोसिएशनने केलेल्या डिजिटल मार्केटिंगबद्दल अनुभव शेअर केले. या अनुभवाची दखल अलीबाबा डॉटकॉमने  घेतली आहे. १८ मे रोजी दुपारी साडेतीन वाजता अलीबाबा डॉटकॉमकडून इंटरनॅशनल वेबिनार होणार आहे. या वेबिनारमध्ये अमित जैन हे दहा मिनिटे देशभरातील  तब्बल वीस हजार व्यापारी, उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत.

डिजिटल मार्केटिंगमधून देश आणि विदेशातील व्यापाºयांना  कसे आकर्षित करता येईल यावर अमित जैन मार्गदर्शन करणार आहेत. यास मेक इन इंडियाची जोड असणार आहे. आंतरराष्ट्रीय वेबिनार मार्गदर्शन करण्यासाठी भारतातून फक्त दोन उद्योजकांची निवड करण्यात आली आहे. सोलापुरातून अमित जैन यांची निवड झाली आहे. ही गोष्ट सोलापूरसाठी मोठी अभिमानाची आहे. संपूर्ण भारताच्या औद्योगिक व्यासपीठावर सोलापूरच्या डिजिटल मार्केटिंगची चर्चा या वेबिनारच्या माध्यमातून होणार आहे. जैन यांच्या निवडीने सोलापुरातील उद्योजकांनी आनंद व्यक्त केला आहे.

सोलापुरातच रोजगार मिळावा म्हणून...- अमित छगनलाल जैन यांचे एमबीए शिक्षण झाले आहे. भारती विद्यापीठातून त्यांनी एमबीएची पदवी घेतली असून, मागील नऊ वर्षांपासून गारमेंट उद्योगात आहेत. दोन वर्षे त्यांनी पुण्यात देखील नोकरी केली. नोकरीत त्यांचे मन रमले नाही. सोलापुरातून इतरत्र स्थलांतरित होणाºया युवकांना सोलापुरातच रोजगार मिळेल या दृष्टीने त्यांनी वडिलांच्या गारमेंट व्यवसायात उडी घेतली. अल्पावधीतच गारमेंट उद्योग वाढीस लावला. स्कूल युनिफॉर्म हब संकल्पना पहिल्यांदा त्यांच्या पुढाकारातून पुढे आली. अमित जैन यांच्या सहकारी उद्योजकांनी सोलापुरात आंतरराष्ट्रीय गारमेंट प्रदर्शन भरवण्याचा निर्णय घेतला. सोलापुरात दोनदा, पुण्यात आणि मुंबईत प्रत्येकी एकदा असे एकूण चार वेळा सोलापूर गारमेंट असोसिएशनने आंतरराष्ट्रीय गारमेंट प्रदर्शन भरवले. त्यास जागतिक पातळीवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

टॅग्स :Solapurसोलापूरbusinessव्यवसायjobनोकरीdigitalडिजिटल