शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची लॉटरी लागणार कुणाला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 10:56 IST

आज होणार फैसला; दोन्ही गटाच्या गुप्त हालचालींना आला वेग

ठळक मुद्दे- सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची आज निवडणूक- जिल्हा परिषदेत पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त- राजकीय हालचालींना आला वेग

सोलापूर : झेडपी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची लॉटरी कुणाला लागणार याकडे आज जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. झेडपीत सत्ता आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची  आघाडी व भाजप पुरस्कृत समविचार आघाडीच्या नेत्यांनी फिल्डिंग लावली आहे.

झेडपीत सत्ता स्थापनेसाठी दोन्ही गटाने आपले सदस्य सहलीवर पाठविले आहेत. हे सदस्य दुपारपर्यंत सोलापुरात दाखल होत आहेत. महाविकास आघाडीचे सदस्य यशवंतनगर येथील नंदादीपवर तर भाजप पुरस्कृत सदस्य गांधीनगर येथील एका मंगल कार्यालयात जमा होणार आहेत. 

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद  पवार, अजित पवार यांनी लक्ष घातल्याने चुरस वाढली आहे. तर इकडे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख, माजी खासदार रणजितसिंह मोहिते—पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. सकाळीच रणजीतदादा आमदार देशमुख यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. समविचारी आघाडीतील कोणाला अध्यक्ष व उपाध्यप करावयाचे यावर चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले.

महाविकास आघाडीचे सदस्य नंदादीपवर थोड्याच वेळात दाखल होणार आहेत. यासाठी आमदार भारत भालके, आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजय शिंदे, माजी आमदार राजन पाटील यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. आता या चुरशीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे.

आवताडे गटाकडे लक्ष- मंगळवेढ्याच्या आवताडे गट कोणाकडे राहणार यावर बहुमताचा आकडा जुळणार असल्याचे सांगितले जात आहे. काही काळ समाधान आवताडे भाजपच्या गोटात चर्चा करीत होते व नंतर त्यांनी आमदार संजय शिंदे यांच्याशी संपर्क साधल्याचे सांगण्यात येत आहे. पदावरून कोणत्या गटात फायदा होईल याकडे आघाड्यांचा कल असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आज प्रत्यक्ष होणाºया निवडणुकीत कोण बाजी मारणार हाच मुद्दा चर्चेचा राहणार आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदElectionनिवडणूकPoliticsराजकारण