शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना जागृतीसाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे नाही निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 11:40 IST

वाढीव निधीसाठी अध्यक्षांकडे फाईल; आजाराबाबत लोकांना नेमकी माहिती उपलब्ध करणारी पत्रके 

ठळक मुद्देकोरोना आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना निधीची गरजवाढीव निधी मागण्याबाबत अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे यांच्याकडे फाईल पाठविण्यात आलीमागील सर्वसाधारण सभेत निधी वर्ग करण्याचा ठराव मंजूर करण्यात आल्याचे तोंडीच सांगण्यात येत आहे

सोलापूर : कोरोना आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे निधीच शिल्लक राहिला नसल्याचे दिसून आले आहे. याबाबत वाढीव निधीसाठी अध्यक्षांकडे फाईल पाठविल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी दिली. 

कोरोना रुग्ण सोलापुरात आढळल्याचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याची गंभीर दखल घेतली. व्हायरस व्हायरल झालेल्या या संदेशाबाबत भीती बाळगू नका, असे त्यांनी आवाहन केले. त्यानंतर आरोग्य विभागाच्या बैठका घेऊन याबाबत जनजागृती करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या. त्यानुसार महापालिका आरोग्य विभागाने जनजागृतीला सुरूवात केली. आजाराबाबत लोकांना नेमकी माहिती उपलब्ध करणारी पत्रके वाटली. पण इकडे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने गेल्या चार-पाच दिवसांत फक्त फायली फिरविणेच सुरू केले आहे. 

कोरोना आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना निधीची गरज आहे. हा निधी मिळेल असे जिल्हा आरोग्य अधिकाºयांनी तालुका आरोग्य अधिकाºयांना कळविले. तालुका आरोग्य अधिकारी निधीची वाट पाहत आहेत. पण इकडे आरोग्य विभागाकडे जनजागृतीवर खर्च घालण्यासाठी निधीच शिल्लक नाही. त्यामुळे वाढीव निधी मागण्याबाबत अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे यांच्याकडे फाईल पाठविण्यात आली. मागील सर्वसाधारण सभेत निधी वर्ग करण्याचा ठराव मंजूर करण्यात आल्याचे तोंडीच सांगण्यात येत आहे. पण सभेत असा ठराव झाल्याचा उतारा न मिळाल्याने आरोग्य विभागाची ही फाईल तशीच पडून आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना आजाराबाबत जनजागृतीचे कोणतेच प्रयोग सुरू झाले नसल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदcorona virusकोरोनाHealthआरोग्यMedicalवैद्यकीय