शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाच्या इमारतीवर बसणाºया रुफ टॉप सोलारमुळे सोलापुरात ६५ किलोवॅट विजेची होणार निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 12:29 IST

सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवर सोलर रुफ टॉप बसविण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. या ...

ठळक मुद्देसोलर कीट बसविण्याचा खर्च स्मार्ट सिटी कंपनी करणारस्मार्ट सिटी कंपनीला एकूण वीज बिल बचतीच्या ६० टक्के रक्कम द्यायची आहेस्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून शहरात पायाभूत सुविधा पुरविल्या जात आहेत

सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवर सोलर रुफ टॉप बसविण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. या कामाच्या तांत्रिक प्रक्रियेला लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ डॉ. अविनाश ढाकणे यांनी सोमवारी दिली. या प्रकल्पातून नियमितपणे ६५ किलोवॅट वीज निर्मिती होईल, असा स्मार्ट सिटी कंपनीचा अंदाज आहे. 

स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून शहरातील शासकीय इमारतींवर रुफ टॉप सोलर बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सोलर कीट बसविण्याचा खर्च स्मार्ट सिटी कंपनी करणार आहे. या बदल्यात शासकीय कार्यालयांनी स्मार्ट सिटी कंपनीला एकूण वीज बिल बचतीच्या ६० टक्के रक्कम द्यायची आहे. सध्या महापालिका इंद्रभुवन इमारत, कौन्सिल हॉल इमारत, महापालिका आयुक्तांचे निवासस्थान, हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर विद्यापीठ, सायन्स सेंटर आदी ठिकाणी सोलर रुफ बसविण्यात आले आहेत. इंद्रभुवन, कौन्सिल हॉल, हुतात्मा स्मृती मंदिर येथील सोलर रुफ टॉपला वीज मीटर बसविण्यात यावे, असे पत्र महावितरणला देण्यात आले आहे. जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवर सोलर रुफ टॉप बसविण्यासाठी न्यायालयाने उच्च न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. नुकतीच ही परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार कामाला सुरुवात होईल, असे डॉ. ढाकणे यांनी सांगितले. 

स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून शहरात पायाभूत सुविधा पुरविल्या जात आहेत. स्वच्छता, पाणीपुरवठा आदींची कामे केली जात आहेत. त्याचबरोबर सोलापूर शहर हे सोलर सिटी व्हावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यातून शासकीय कार्यालयांवर सोलर कीट बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

जिल्हा परिषद देणार पत्र - जिल्हा परिषदेच्या मुख्यालयावर रुफ टॉप सोलर बसविण्याचे नियोजन जिल्हा परिषद प्रशासनाने सुरू केले होते. यासाठी जवळपास १ कोटीहून अधिक रुपयांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली होती. परंतु, यादरम्यान स्मार्ट सिटी कंपनीच्या प्रस्तावाबद्दल माहिती समजल्यानंतर झेडपी अध्यक्ष संजय शिंदे आणि सीईओ डॉ. राजेंद्र भारुड यांनी स्मार्ट सिटी कंपनीला पत्र पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. हे पत्र मिळाल्यानंतर यासंदर्भातही प्रस्ताव तयार करण्यात येईल, अशी माहिती स्मार्ट सिटी कंपनीकडून देण्यात आली. 

टॅग्स :SolapurसोलापूरSmart Cityस्मार्ट सिटीSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका