शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

मराठी नाट्य परिषदेच्या ‘कार्यकारिणी’साठी सोलापूरचे चौघे लढणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 10:08 IST

नाट्य परिषद निवडणूक : ६ एप्रिल रोजी मुंबईत होणार मतदान

ठळक मुद्देमुंबईतील यशवंतराव प्रतिष्ठानच्या सभागृहात मतदान होणार१४ मार्च ते १९ मार्चदरम्यान निवडणूक अर्ज भरण्याची मुदतनियामक मंडळाच्या निवडणुकीत ६० सदस्य विजयी

रवींद्र देशमुख सोलापूर: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची निवडणूक झाल्यानंतर आता एकोणीस सदस्यांच्या कार्यकारिणीसाठी ६ एप्रिल रोजी मतदान होणार असून, सोलापूरचे चार नवनिर्वाचित सदस्य आता १ सहकार्यवाह आणि तीन सदस्यत्वाच्या जागा मिळविण्यासाठी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत.

मुंबईतील यशवंतराव प्रतिष्ठानच्या सभागृहात मतदान होणार असून, १४ मार्च ते १९ मार्चदरम्यान निवडणूक अर्ज भरण्याची मुदत आहे. सोलापूर जिल्ह्यातील नाट्य परिषदेच्या आठ शाखांच्या वतीने सहकार्यवाहपदासाठी पंढरपूरचे दिलीप कोरके आणि ३ कार्यकारिणी सदस्यपदासाठी उपनगरीय शाखेचे जे. पी. कुलकर्णी, सोलापूर शाखेचे आनंद खरबस आणि सांगोल्या शाखेचे चेतनसिंह केदार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. २० मार्च रोजी अर्जांची छाननी होणार आहे. २५ मार्चपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असून, त्यानंतर मतदान होणार आहे.

नाट्य परिषदेच्या राज्यभरात झालेल्या नियामक मंडळाच्या निवडणुकीत ६० सदस्य विजयी झाले. काही ठिकाणी बिनविरोध निवडणुकाही झाल्या. नियामक मंडळाचे हे ६० सदस्य कार्यकारिणीच्या निवडणुकीतील मतदार आहेत. सोलापुरातून नियामक मंडळावर वरील चार उमेदवारांसह सोमेश्वर घाणेगावकर (बार्शी), यतिराज वाकळे (मंगळवेढा) हे विजयी झाले होते. हे सहाही जण कार्यकारिणीसाठीच्या मतदानासाठी मुंबईला जाणार आहेत.

नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मोहन जोशी पॅनलकडून डॉ. अमोल कोल्हे हे निवडणूक लढवित आहेत; तर प्रसाद कांबळी हे त्यांना लढत देत आहेत. अध्यक्षपदासाठी ३१ ही मॅजिक फिगर असून, सोलापुरातील जोशी पॅनलच्या समर्थकांनी ३५ सदस्य आपल्या बाजूने असल्याचा दावा केला आहे.

प्रमुख पदाधिकारी मुंबईचेच !- नाट्य परिषदेच्या कार्यकारिणीतील अध्यक्ष, कोषाध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि उपाध्यक्ष (प्रशासकीय) ही पदे नेहमीच मुंबईतील सदस्यांकडे दिली जातात. परिषदेचे निर्णय तातडीने घेण्याची निकड निर्माण झाली तर तसे निर्णय घेता यावेत, यासाठीच प्रमुख पदाधिकारी मुंबईचे असणे गरजेचे आहे, ही भूमिका आहे. यापार्श्वभूमीवर सोलापूरने कार्यकारिणीतील प्रमुख पदाची मागणी केली नाही. सहकार्यवाहपद आणि तीन सदस्य अशी मागणी केली आहे, असे नाट्य परिषदेच्या उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजय साळुंखे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

कार्यकारिणी अशी आहे..

  • - अध्यक्ष, २ उपाध्यक्ष (प्रशासकीय, कार्यक्रम), ३ सहकार्यवाह, १ कोषाध्यक्ष,१  प्रमुख कार्यवाह आणि ११ कार्यकारिणी सदस्य. ही कार्यकारिणी १९ जणांची असून, नियामक मंडळाचे सदस्य यंदा मतदानाद्वारे कार्यकारिणी निवडणार आहेत.
टॅग्स :SolapurसोलापूरElectionनिवडणूकMumbaiमुंबई