शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर विद्यापीठ युवा महोत्सव; मांडव सजला.. तरुणाई मोहरली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 12:19 IST

सोलापूर : उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या युवा महोत्सवासाठी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात एकच लगबग सुरु आहे. मांडव उभारणीचे काम अंतिम ...

ठळक मुद्देकलाप्रकार सादर करणाºया सर्व विद्यार्थ्यांना स्वतंत्र ओळखपत्र सिंहगड संकुलात ९५ सीसीटीव्ही कॅमेरे महोत्सवातील सर्व हालचालींवर करडी नजर ठेवणारयंदाही हा महोत्सवदेखील देखणा आणि नेटका असणार

सोलापूर: उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या युवा महोत्सवासाठी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात एकच लगबग सुरु आहे. मांडव उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. धूळ उडू नये यासाठी रोलर फिरु लागलाय. दुसºयांदा यजमानपद मिळालेल्या सिंहगड समूहाने तयारी जोरात चालवली असून, यंदाही हटके नियोजन करण्याचा निर्धार केल्याचे स्पष्ट करीत सिंहगड शिक्षण संकुलाच्या प्रशासनाने  पुन्हा तयारीचा आढावा घेतला. 

महोत्सवात कला सादर करण्यासाठी येणाºया जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या कलावंत संघाच्या निवास, भोजन व्यवस्थेपासून महोत्सव पाहण्यासाठी येणाºया तरुणाई, पालकांच्या स्वागतासाठी कुचराई होणार नाही याची दक्षता घेण्यात येत असल्याचे प्राचार्य शंकर नवले यांनी सांगितले. 

शनिवारपासून रंगणाºया उन्मेष सृजन रंगाचा या युवा महोत्सवासाठी सिंहगडनगरी सज्ज झाली आहे. २०१५ सालीदेखील विद्यापीठाचा १३ वा युवा महोत्सव नेटक्या नियोजनामुळे लक्षात राहिल्याच्या भावना अनेक कलावंतांनी व्यक्त केल्या. यंदाही हा महोत्सवदेखील देखणा आणि नेटका असणार आहे यात काही शंका नाही, असा विश्वास कार्याध्यक्ष प्रा़डॉ़ शंकर नवले यांनी बोलताना व्यक्त केला.महोत्सव शांततेत आणि जल्लोषात होण्यासाठी बीट मार्शल, दामिनी पथक आणि बाळे पोलीस चौकीच्या पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. शिवाय महाविद्यालयाचे ६० सुरक्षारक्षक तैनात असणार आहेत. काही समस्या उद्भवल्यास युवा महोत्सव समितीशी संपर्क साधल्यास तातडीने त्याचे निराकरण होईल, असे स्पष्ट केले.

९५ सीसीटीव्ही कॅमेºयांची करडी नजर- सिंहगड संकुलात ९५ सीसीटीव्ही कॅमेरे महोत्सवातील सर्व हालचालींवर करडी नजर ठेवणार आहेत. दूरच्या अंतरावरील छायाचित्रणही ठळकपणे पाहता येणार आहे. सर्व कलावंत, प्रेक्षकांना महोत्सवाचा निर्भेळ आनंद लुटण्यासाठी कडक अंमल करण्यात येत असल्याचे यजमान महाविद्यालयाकडून सांगण्यात आले.

दक्षतेसाठी..पीआरएन नंबर सक्तीचा- महोत्सवात कलाप्रकार सादर करणाºया सर्व विद्यार्थ्यांना स्वतंत्र ओळखपत्र दिले जाणार आहे. त्यावर त्याचा पीआरएन नंबर सक्तीचा आहे. त्या दृष्टीने यंत्रणा कामास लागली आहे. यामुळे विद्यार्थी कलावंतांचे नाव, वय, कोणत्या महाविद्यालयाचा ही सर्व माहिती निश्चित होणार आहे. महोत्सवात कला प्रकार सादर करण्यासाठी निर्माण होणारी समस्या पुन्हा उद्भवू नये या दृष्टीने ही दक्षता घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. 

महोत्सवाची थिम- महोत्सवात स्त्री सन्मानाचा जागर होणार आहे. त्यासाठी लोगोही प्रसारित करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक रंगमंच, व्यासपीठांना महिलांची नावे दिली आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूरsinhagad instituteसिंहगड इन्स्टिट्युट