शहरं
Join us  
Trending Stories
1
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
2
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
3
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
4
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
5
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
6
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
7
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
8
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
9
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
10
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
11
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
12
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
13
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
14
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
15
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
16
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
17
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
19
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
20
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाच्या माध्यमातून मिळणार १०० कोटीची निधी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 12:21 IST

सोलापूर विद्यापीठाला रुसाकडून (राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान) १०० कोटींचा निधी मिळणार आहे. या निधीतून सेंटर फॉर स्मार्ट सिटीची उभारणी करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटीमध्ये आवश्यक बाबींवर संशोधन केले जाणार आहे.

ठळक मुद्देस्मार्ट सिटीमध्ये आवश्यक बाबींवर संशोधन केले जाणार सोलापूर विद्यापीठाने यापूर्वी रुसाकडे २७३ कोटी रुपयांचा प्रस्ताव ठेवला होतासंशोधनाचा उपयोग सोलापूरसह देशातील सर्व स्मार्ट सिटीला होणार स्मार्ट सिटीसाठीच्या संकल्पनेला अंतिम स्वरूप देण्याचे काम यातून केले जाणार

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २०  : सोलापूर विद्यापीठाला रुसाकडून (राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान) १०० कोटींचा निधी मिळणार आहे. या निधीतून सेंटर फॉर स्मार्ट सिटीची उभारणी करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटीमध्ये आवश्यक बाबींवर संशोधन केले जाणार आहे.सेंटर फॉर स्मार्ट सिटीसाठी २१ डिसेंबर रोजी सोलापूर विद्यापीठाकडून रुसाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. सोलापूर विद्यापीठाने यापूर्वी रुसाकडे २७३ कोटी रुपयांचा प्रस्ताव ठेवला होता, यावर रुसाने १०० कोटी देण्याचे मान्य केले असून, यासाठीचा नवा प्रस्ताव देण्यास सांगितले आहे.स्मार्ट सिटी संबंधित संशोधन व इतर कामांसाठी रुसाने दिलेल्या १०० कोटींचा वापर तीन वर्षांसाठी केला जाणार आहे. सोलापूर शहराचा स्मार्ट सिटी योजनेमध्ये समावेश झाल्यामुळे सेंटर फॉर स्मार्ट सिटीला मोठे महत्त्व येणार आहे. सोलापूर विद्यापीठाकडून केल्या जाणाºया संशोधनाचा उपयोग सोलापूरसह देशातील सर्व स्मार्ट सिटीला होणार आहे. स्मार्ट सिटीमध्ये आवश्यकअसणाºया सेवा व वस्तू याबद्दल संशोधन करण्यात येणार आहे.--------------------संशोधनातून विद्यापीठाला उत्पन्नही मिळणारसेंटर फॉर स्मार्ट सिटीची इमारत १० हजार चौरस मीटरच्या क्षेत्रात उभी केली जाणार आहे. या सेंटरचा वापर सोलापूर विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी व शिक्षकांना करता येणार आहे. रुसा योजनेतून सोलापूर विद्यापीठाला तीन वर्षांसाठी १०० कोटी मिळणार आहेत. या तीन वर्षांनंतर सेंटर फॉर स्मार्ट सिटी पूर्ण होईल. विविध बाबींवर सल्ला देणे व सुविधा देणे यातून विद्यापीठाला उत्पन्नही मिळणार आहे.----------------मनपाच्या स्मार्ट सिटी उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी सोलापूर विद्यापीठाचे नेहमीच सहकार्य असेल. स्मार्ट सिटीसाठीच्या संकल्पनेला अंतिम स्वरूप देण्याचे काम यातून केले जाणार आहे. यासाठी सोलापूर विद्यापीठ १९ विविध प्रकल्पांवर काम करणार आहे. राज्यातील प्रत्येक विद्यापीठाला ‘रुसा’च्या माध्यमातून असे संशोधन करायचे आहे, यामुळे प्रत्येक विद्यापीठात त्याच प्रकारचे संशोधन न होता नवीन संकल्पना प्रत्यक्षात येतील.- डॉ. गणेश मंझा, कुलसचिव, सोलापूर विद्यापीठ

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूर