शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर विद्यापीठ पुण्यश्लोक होळकर नामविस्तारास न्यायालयाची स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 15:55 IST

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय जाहीर करत ३१ मे रोजी जाहीर कार्यक्रमात नामविस्तार करण्याची घोषणा राज्याचे शालेय आणि उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली. मात्र याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करत सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्तारास स्थगिती देण्याचा निर्णय दिला.विद्यापीठाला पुण्यश्लोक होळकर यांचे ...

ठळक मुद्देन्यायालयाने नामविस्तार ५ जून पर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय दिलानाव देण्यावरून धनगर समाज आणि लिंगायत समाज आमने-सामने आले होते

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय जाहीर करत ३१ मे रोजी जाहीर कार्यक्रमात नामविस्तार करण्याची घोषणा राज्याचे शालेय आणि उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली. मात्र याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करत सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्तारास स्थगिती देण्याचा निर्णय दिला.

विद्यापीठाला पुण्यश्लोक होळकर यांचे नाव देण्यावरून धनगर समाज आणि लिंगायत समाज आमने-सामने आले होते. मात्र याप्रकरणी राज्य सरकारने या दोन्ही समाजात समेट घडवून आणत विद्यापीठास पुण्यश्लोक होळकर यांचे नाव देत नाम विस्तार करण्याचा निर्णय घेतला. तसेच या नाम विस्ताराचा कार्यक्रम ३१ मे रोजी आयोजित करण्याची घोषणाही केली. परंतु याप्रकरणी एका व्यक्तीने नाम विस्ताराला आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

त्यावरील सुणावनी वेळी उच्च न्यायालयाने नामविस्तार ५ जून पर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय दिला.

यासंदर्भात शालेय आणि उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्तारास न्यायालयाने ५ जून पर्यंत स्थगिती दिल्याचे सांगितले. मात्र न्यायालयाच्या निकालावर अधिकचे भाष्य करणे टाळले. यात याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड़ सतीश तळेकर आणि अ‍ॅड़ सुधीर हळ्ळी यांनी काम पाहिले़

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूर