शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

सोलापूर विद्यापीठाच्या अधिकार मंडळ निवडणूक; खुल्या गटातून कोळेकर, कडू विजयी

By appasaheb.patil | Updated: September 30, 2022 12:16 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज शुक्रवारी सकाळी दहा वाजता सुरुवात झाली आहे.  सुरुवातीला सिनेटच्या विद्यापीठ शिक्षकांची मतमोजणी झाली. यामध्ये खुल्या गटातून डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी  १४ मते घेऊन विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी डॉ. विकास घुटे यांना आठ मते मिळाली. त्यांचा पराभव झाला. अनुसूचित जमाती प्रवर्गातून डॉ. विकास कडू यांनी १६ मते घेऊन विजय संपादन केला. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार डॉ. श्रीराम राऊत यांना पाच मते मिळाली त्यांचा पराभव झाला.

कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी योगिनी घारे यांनी मतमोजणीला सुरुवात केली आहे. मतमोजणीसाठी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी विद्यापीठात उपस्थित आहेत. पसंतीक्रमानुसार मतपत्रिकेवर मतदान झाल्याने निकाल हाती घेण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे. कोटा पद्धत मतमोजणीला अवलंबण्यात येतो. त्यामध्ये पदवीधरसाठी अधिक मतदान असल्याने मतमोजणीला विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री उशिरा अथवा शनिवारी सकाळी सर्व मतदार संघातील निकाल जाहीर होण्याची शक्यता विद्यापीठ प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूरElectionनिवडणूक