शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: उकाडयाने हैराण होऊन झोपी गेले घरावर, सेफ्टी लॉक तोडून डल्ला मारला सोन्यांवर

By काशिनाथ वाघमारे | Updated: June 3, 2023 22:31 IST

Solapur: माढा तालुक्यात कन्हेरगाव येथे एका शेतकरी कुटूंबाला उकाड्याने हैराण होऊन घराच्या छतावर जाऊन झोपणे चांगलेच महागात पडले आहे. रात्रीत घर फोडून चोरट्यांनी दागिन्यांसह ३ लाख ६४ हजारांचा ऐवज पळवल्याची घटना घडली.

- काशिनाथ वाघमारे सोलापूर  - माढा तालुक्यात कन्हेरगाव येथे एका शेतकरी कुटूंबाला उकाड्याने हैराण होऊन घराच्या छतावर जाऊन झोपणे चांगलेच महागात पडले आहे. रात्रीत घर फोडून चोरट्यांनी दागिन्यांसह ३ लाख ६४ हजारांचा ऐवज पळवल्याची घटना घडली. मध्यरात्रीत चोरट्यांनी घर फोडल्याचे पहाटे निदनर्शनास येताच या कुटूंब प्रमुखाने पोलिसात धाव घेतली. ही घटना २ जून रोजी रात्री घडली असून याबाबत जोतीराम बबन भरगंडे यांनी टेंभुर्णी पोलिसात फिर्याद दिली आहे. या घरफोडीने गावात खळबळ उडाली आहे.

पाेलीस सूत्राकडील माहितीनुसार ज्योतीराम भरगंडे यांचे कुटुंबीय शुक्रवार, २ जून रोजी रात्री जेवण आटोपून घराच्या छतावर झोपण्यासाठी गेले होते. शनिवारी पहाटे ५ वाजण्यापूर्वी दरम्यान चोरट्यांनी भरगंडे यांच्या दरवाज्याचे सेफ्टी लॉक तोडून घरात प्रवेश केला. कपाट उचकटून रोख १ लाख ३० हजार रुपये व कपाटातील एक तोळे सोन्याचे नेकलेस, तीन तोळ्याचे गंठण, अर्ध्या तोळ्याची साखळी व अर्ध्या तोळ्याच्या चार अंगठ्या असे २ लाख ३४ हजार किंमतीचे ७ तोळ्याचे सोन्याचे दागीने चोरून नेले आहे.

या घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी सकाळी कन्हेरगाव येथे घटनास्थळी धाव घेतली. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांनीही घटनास्थळावर धाव घेतली. अधिक तपास टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के हे करीत आहेत.अधिक तपास टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के हे करीत आहेत.

ठसेतज्ज्ञ अन श्वानपथकाला पाचारण...शनिवारी दुपारी सोलापूर येथील ठसेतज्ज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले. पोलीस हवालदार जयवंत सादुल , पोलीस हवालदार उमेश गुटाळ, पोलीस कॉन्स्टेबल सतीश बुरकुल यांनी घटनास्थळी भेट देऊन ठशांचे नमुने घेतले. त्यानंतर श्नानपथकालाही पाचारण करण्यात आले. या पथकाचे पोलीस हवालदार गावडे, पोलीस हवालदार जंगले यांनीही प्रयत्न केला. हे श्वान रतिलाल मोरे यांच्या मोरे वस्ती पर्यंत धावले.

जनावरांना शेड बांधण्यासाठी बँकेतून काढली होती रोकडभरगंडे यांनी दहा दिवसापूर्वीच जनावरांचा शेड बांधण्यासाठी बँकेतून १ लाख ५० हजार रुपये काढले होते. त्यातील २० हजार रुपये खर्च झाले होते व १ लाख ३० हजार रुपये त्यांनी साडीत गुंडाळून कपाटात ठेवले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूर