शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
3
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
4
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
5
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
6
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
7
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
8
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
9
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
10
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
11
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
12
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
13
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
14
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
15
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
16
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
17
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
18
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
19
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
20
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम

Solapur: वाहन चालकांपासून मंडलाधिकाऱ्यांपर्यंत १५० जणांच्या बदल्या, जिल्हाअंतर्गत बदल्यांमुळे ‘कहीं खुशी, कहीं गम’

By संताजी शिंदे | Updated: June 21, 2023 17:17 IST

Solapur: सर्वांचे लक्ष लागून असलेल्या जिल्हा प्रशासनातील मंडल अधिकाऱ्यांपासून वाहनचालकांपर्यंत १५० जणांच्या बदल्या झाल्या आहेत. जिल्हाअंतर्गत झालेल्या या बदल्यांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये ‘कहीं खुशी, कहीं गम’ असे वातावरण असल्याचे बोलले जात आहे.

- संताजी शिंदे सोलापूर - सर्वांचे लक्ष लागून असलेल्या जिल्हा प्रशासनातील मंडल अधिकाऱ्यांपासून वाहनचालकांपर्यंत १५० जणांच्या बदल्या झाल्या आहेत. जिल्हाअंतर्गत झालेल्या या बदल्यांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये ‘कहीं खुशी, कहीं गम’ असे वातावरण असल्याचे बोलले जात आहे.

महसूल विभागातील २८ मंडलाधिकारी, ५४ अव्वल कारकून, ६२ महसूल सहायक तर ६ वाहनचालकांच्या बदल्या झाल्या आहेत. वास्तविक पाहता ३१ मे अखेर या बदल्या अपेक्षित होत्या. मात्र, राज्य शासनाने ३० जूनपर्यंत एक महिन्याची मुदतवाढ दिली होती. २८ मंडल अधिकाऱ्यांमध्ये मंडल अधिकारी उमेश डोईफोडे (बार्शी) यांची सौंदरे (बार्शी) येथे बदली करण्यात आली आहे. शोभना चव्हाण (करमणूक शाखा जिल्हाधिकारी कार्यालय ते पुनर्वसन शाखा जिल्हाधिकारी कार्यालय), मनीषा लकडे (टेंभुर्णी ते करमणूक कर शाखा जिल्हाधिकारी कार्यालय), सुजित शेळवणे (लवूळ ते टेंभुर्णी, ता. माढा) अशा बदल्या झाल्या आहेत.

बदल्या झालेल्यांमध्ये कंसात सध्याचे ठिकाण व बदली झालेले ठिकाण पुढीलप्रमाणे-संतोष सुरवसे (चळे ते पुळूज ता. पंढरपूर), सारिका वाव्हळ (पेनुर ते कसबे सोलापूर), ज्ञानोबा माळी (वाघोली मोहोळ ते बोरामणी दक्षिण सोलापूर), गजानन जाधव (उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. १ ते विंचूर ता. दक्षिण सोलापूर), संतोष कांबळे (वागदरी ते बाळे उत्तर सोलापूर), अव्वल कारकून कलावती कोटे (तहसीलदार कार्यालय मोहोळ ते वाघोली मोहोळ), अनिल ठाकर (तहसीलदार करमाळा ते मंडलाधिकारी जेऊर करमाळा), मंडल अधिकारी रवींद्र ननवरे (सांगोला ते फोंडशिरस ता. माळशिरस), दीपक शिंदे (भंडी शेगाव ते चळे पंढरपूर) असे आहे.

काहींना मिळाली एक वर्षाची मुदतवाढ -० सादिक काझी (अर्जुन नगर ते इंगायो अ. का. करमाळा), दिनेश भडंगे (महूद हे भंडी शेगाव पंढरपूर), संतोष फुलारी (विंचूर ते मंडलाधिकारी सिटी सर्वे उत्तर सोलापूर), रेवणाथ वळेकर (जेऊर करमाळा ते अर्जुननगर करमाळा), नागनाथ जोध (भोसे मंगळवेढा ते रोहियो तहसील करमाळा), संदीप चव्हाण (नातेपुते माळशिरस ते वेळापूर माळशिरस), बालाजी नागटिळक (पुनर्वसन शाखा सोलापूर ते अनगर मोहोळ), शेखर तपासे (पिलीव माळशिरस ते कुळ कायदा तहसील पंढरपूर), संतोष गोसावी अव्वल कारकून (करमाळा ते मंडलाधिकारी जिंती करमाळा), राजकुमार कोळी (चपळगाव अक्कलकोट, सध्या पदावर एक वर्ष मुदतवाढ), अव्वल कारकून राजेंद्र बारगजे (करमणूक शाखा, सध्या पदावर एक वर्ष मुदतवाढ), सोमनाथ जाधव (आंधळगाव मंगळवेढा ते पेनुर मोहोळ), बाळू कदम (संगेवाडी सांगोला ते रोपळे पंढरपूर), गणेश तिके (पुळुज पंढरपूर ते कोळा सांगोला), तुकाराम कोळी (करमणूक शाखा जिल्हाधिकारी कार्यालय ते उप जिल्हाधिकारी भूसंपादन क्र. १) अशा बदल्या झाल्या आहेत.

टॅग्स :TransferबदलीSolapurसोलापूर