शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

Solapur tourism; सोलापुरी पर्यटनाचं ब्रँडिंग हवं !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 12:26 IST

विलास जळकोटकर सोलापूर : हजारो वर्षांची परंपरा असलेल्या सोलापूर जिल्ह्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक  असा समृद्ध वारसा लाभलेला आहे.  जिल्ह्याच्या आजूबाजूला ...

ठळक मुद्देऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या शहरात भुईकोट किल्लानव्या युगांच्या  शिलेदारांना प्रेरणा मिळावी यासाठी येथे खगोलीय माहिती देणारी विज्ञानशाळावैभव सातासमुद्रापार पोहवण्यासाठी आपण सोलापूरकरांनी एक पाऊल पुढं टाकायला हवं

विलास जळकोटकर सोलापूर : हजारो वर्षांची परंपरा असलेल्या सोलापूर जिल्ह्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक  असा समृद्ध वारसा लाभलेला आहे.  जिल्ह्याच्या आजूबाजूला असलेल्या मराठवाड्यातील तुळजाभवानी बरोबरच पंढरपूरचा पांडुरंग, अक्कलकोटचे स्वामी समर्थ देवस्थान हे धार्मिक पर्यटनस्थळे आहेत. या जोडीलाच सोलापूर शहरानं गेली कित्येक वर्षे आपला आगळावेगळा ठसा जपला आहे. या सोलापुरी ब्रँडचं ब्रँडिंग तुम्ही, आम्ही, आपण करायला हवंय...

यात सर्वप्रथम सोलापूरचं दैवत असलेल्या सिद्धेश्वर मंदिरानं नेहमीच बाहेरुन येणाºया पर्यटकांना नेहमीच भुरळ घातलेली आहे.  १२ व्या शतकात हे मंदिर बांधल्याचं सांगण्यात येतंय. 

अनेकांनी या मंदिराला सुवर्णमंदिराची प्रतिकृती म्हणूनही गौरवलं  आहे. चहूबाजूला निळेशार पाणी आणि मधोमध असलेलं मंदिर सोलापूर शहराचं काय जिल्ह्याचं भूषण ठरलं आहे. परगावाहून येणारा पाहुणा एकदातरी हमखास  या मंदिरात आल्याशिवाय राहत नाही. जाताना तो मनोमन सुखावतो अन् इतरांनाही या प्रेक्षणीय धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी उत्तेजीत करतो. आता या क्षेत्राकडं अधिकाधिक पर्यटकांनी आकर्षित व्हावं या दृष्टीनं मंदिर समितीनेही प्रयत्न चालवले आहेत. या जोडीला शहराच्या प्रत्येक नागरिकानंही आपल्याकडे येणाºया पै पाहुण्यांना आपल्या शहराचं वैभव सांगितलं पाहिजे. त्याचं ब्रँडिंग करायला पाहिजे. 

भुईकोट किल्ला निश्चित केव्हा बांधला याबद्दल तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत.  कॅपेबल यांच्या मते बहामनी बादशहा महमदशहा यांच्या कारकिर्दीत इ. स. १३५८ ते १३७५ या दरम्यान बांधला असावा तर डॉ. हंटर म्हणतात १३४५ सालात तो बांधला. याशिवाय तोरो यांनी सचित्र महाराष्टÑ पुस्तकात किल्ल्याचा बाहेरील कोट इ.स. १३१३ मध्ये हसन गंगु बहामनी यांनी बांधला; मात्र आतील कोट हिंदू राजांनी १२ व्या शतकात बांधला अशी माहिती नमूद केली आहे. सोलापूरचे मल्लिकार्जुन पाटील यांनी हा किल्ला इ.स. १४५६ साली बांधला असे आपले मत नोंदवून ठेवले आहे. दुसरा महंमदशहा बहामनी (१४६६ ते १४८२) यांचा हुशार दिवाण महमद गवान याने सोलापूर व परांडा हे दोन्ही सारखीच बांधणी असलेले किल्ले एकाचवेळी बांधले असावेत असे काहींचे मत आहे. 

संपूर्ण किल्ल्याची बांधणी एकाच काळात पूर्ण झाली नाही. त्यात वेळोवेळी विविध इमारतींची भर पडत गेली आणि फेरफार होत गेले ही गोष्ट निर्विवाद सत्य आहे. किल्ल्याच्या पहिल्या म्हणजे हत्ती दरवाजाचे दुरुस्तीचे व लोखंडी खिळे बसविण्याचे काम हा किल्ला इंग्रजांनी घेण्यापूर्वी आठ वर्षे अगोदर झाले होते. किल्ल्याच्या  बांधकामात पूर्वीचे दगड इमारतीपैकी असून, त्यापैकी काही १२/१३ व्या शतकातील असावेत. किल्ल्यात हेमाडपंथी अवशेषही आहेत. असा हा सोलापूर वैभव असलेला हा किल्ला आजही इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभा आहे. 

यानंतर महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयानंही नेहमीच सर्वांचं लक्ष वेधलंय. इथं बिबट्यांपासून ते मगर, काळविटं, हरीण, तरस, वन्यजीव पक्ष्यांच्या विविध प्रजाती बालगोपाळांना आकर्षण ठरताहेत. सुमारे पाच हजार एकराच्या सिद्धेश्वर वनविहारामध्ये नैसर्गिक बाज जपण्याचा प्रयत्न केलाय. पर्यटकांना आकर्षित करणारे सेल्फी पॉर्इंट, नैसर्गिक नाला, पशुपक्ष्यांची माहिती देणारं स्वतंत्र दालन इथं साकारलं आहे. वन औषधी झाडांचीही लागवड करण्यात आलेली आहे. पर्यावरणाची माहिती देणारी युको लायब्ररीही कार्यरत आहे. इथं सहलीच्या निमित्तानं येणाºया लोकांच्या ज्ञानामध्ये भर पडण्याबरोबरच इथून परत जाणारा पर्यटक आनंद लुटण्याबरोबरच ज्ञानामृतही घेऊन जातो. 

याशिवाय इथंली खाद्य संस्कृतीनंही आपला बाज कायम राखला आहे. इथं सोलापुरी कडक भाकरी, शेंगा चटणी बरोबरच बाहेरुन येणाºया पर्यटकांसाठी त्यांच्या प्रांतातली पदार्थही इथं  आवर्जून मिळतात. आपली खासियत जपण्या बरोबरच  या शहरानं बाहेरच्या खाद्य संस्कृतीलाही आपलंस केलं आहे. असा समृद्ध वारसा जपणाºया शहराचं वैभव सातासमुद्रापार पोहवण्यासाठी आपण सोलापूरकरांनी एक पाऊल पुढं टाकायला हवं. खरय ना! चला तर मग... 

ऐतिहासिक भुईकोटया जोडीलाच ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या शहरातला हा भुईकोट किल्ला महाराष्टÑातील प्राचीन दुर्गातील एक मानला जातो. आजही तो प्राचीन इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभा आहे. सोलापूर शहराचे हे वैभव आहे. स्मृती उद्यानाचा ठसा कायमस्मृती उद्यानानंही आपला ठसा कायम ठेवलाय. इथं पर्यावरणप्रेमींनी या उद्यानाची शोभा वाढवण्यासाठी आपल्या माता-पित्यांच्या स्मरणार्थ वेगवेगळ्या वृक्षांचे संगोपन केले आहे. सांस्कृतिक उपक्रमांना चालना देण्यासाठी बैठे दालनही उघडले आहे. दर्दी रसिकजन येथे आवर्जून येतात. नव्या युगांच्या  शिलेदारांना प्रेरणा मिळावी यासाठी येथे खगोलीय माहिती देणारी विज्ञानशाळाही कार्यान्वित आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरtourismपर्यटनSmart Cityस्मार्ट सिटीSiddheshwar Templeसिध्देश्वर मंदीरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका