शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

Solapur tourism ; पंढरपूर हे धार्मिक पर्यटनासोबत खुणावतंय तुळशीवनाचे सौंदर्य 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 12:40 IST

प्रभू पुजारी  पंढरपूर : पंढरपूर म्हटलं की, डोळ्यांसमोर येतं ते विठ्ठलाचं सावळं, सुंदर, मनोहारी रूप. पंढरीतील ती चंद्रभागा, इथला ...

ठळक मुद्देगोपाळपूर रोडलाच नदीपात्रात विष्णुपद मंदिर आहे़ आजही या ठिकाणी श्रीकृष्ण व गायीच्या खुराचे ठसे दिसतातपंढरपुरात धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने सुधारणा होत आहेत़ नामसंकीर्तन आणि नाट्यगृहही उभारले जात आहे.

प्रभू पुजारी पंढरपूर : पंढरपूर म्हटलं की, डोळ्यांसमोर येतं ते विठ्ठलाचं सावळं, सुंदर, मनोहारी रूप. पंढरीतील ती चंद्रभागा, इथला टाळ, मृदंगाचा निनाद अन् भजन, कीर्तनाचे स्वऱ़़ या ठिकाणी तुम्हाला भक्तिभावासोबत धार्मिक पर्यटनाचा आनंद लुटता येतो.

या भूवैकुंठ नगरीत पांडुरंगाचं व रुक्मिणीचं वेगळं मंदिर आहे. हे मंदिर शिल्पकलेचाही एक उत्तम नमुनाच़ मंदिराला एकूण आठ प्रवेशद्वार आहेत़ पूर्वेकडील प्रवेशद्वारास नामदेव पायरी म्हटलं जातं़ तिथून प्रवेश केल्यानंतर १० मीटर उंचीच्या दोन दीपमाळा व जवळच विष्णुवाहन गरुड व हनुमानाचं मंदिर दिसतं़ पुढं सोळा-खांबीत जाता येतं़ सोळा कोरीव दगडी खांब असून, गरुडस्तंभ चांदीच्या पत्र्यानं मढवलेला दिसतो़ इथं येणारा भाविक या खांबाला आलिंगन देऊन भेटतात.

गोपाळपूर रोडलाच नदीपात्रात विष्णुपद मंदिर आहे़ आजही या ठिकाणी श्रीकृष्ण व गायीच्या खुराचे ठसे दिसतात़ पंढरपुरात धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने सुधारणा होत आहेत़ नामसंकीर्तन आणि नाट्यगृहही उभारले जात आहे.

कैकाडी मठाची रचना चक्रव्यूहासारखा प्रदक्षिणा मार्ग व उजव्या बाजूला विविध पुतळे अशी चार मजली इमारत आहे. एकदा मठात प्रवेश केला की, मध्येच प्रदक्षिणा सोडता येत नाही. सर्व दालने बघून झाल्यानंतर बाहेर पडता येते. त्यामुळे प्रदक्षिणेचा अवधी काही तासांवर जातो. प्रदक्षिणा किंवा दालनफेरी अगदी जलद करायची म्हटली तरी ३५ ते ४० मिनिटे लागतात. कैकाडी महाराजांचे पुतणे रामदास महाराज हे या मठाचे व्यवस्थापन पाहतात. 

तुळशीवन एक पर्यटनस्थळचभाव अन् भक्ती गीतांची सुमधुर धून, लख्ख प्रकाशात चमकणाºया विविध देवतांच्या मूर्ती, रंगीबेरंगी विविध आकारांची फुले, आठ प्रकारातील तुळशीची झाडे, भित्तीचित्रातून साकारलेले तब्बल २३ संतांचे जीवनचरित्र, मनमोहक कारंजे, शेजारच्या तलावात दिसणारे विविध पक्ष्यांचे थवे़़़ हे सर्व विहंगम दर्शन आता पंढरीत येणाºया भाविकांना पाहायला मिळत आहे, ते पंढरीतील यमाई-तुकाई तलावाशेजारीच तुळशी वृंदावनात़ सध्या ते एक पंढरीतील पर्यटनस्थळ म्हणून नावरूपाला येत आहे.

भाविकांच्या सोयीसाठी भक्तनिवास अन् अन्नछत्र कार्यरतपंढरपुरात येणाºया भाविकांसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने वेदांत भक्तनिवास, नव्याने बांधण्यात आलेले विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास यासह विविध मठ या ठिकाणी भक्तनिवासाची सोय होते़शिवाय मंदिर समितीचे अन्नछत्र सुरू आहे़

टॅग्स :Solapurसोलापूरtourismपर्यटनPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर