शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

Solapur tourism ; देशभरातील पर्यटकांना राजवाडा अन् श्री स्वामी समर्थांचं आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 12:36 IST

शिवानंद फुलारी  अक्कलकोट : येथील ऐतिहासिक राजवाडा, जागतिक पातळीवरील अग्निहोत्र केंद्र, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असा संदेश ...

ठळक मुद्दे राजवाडा हा जुनाच असला तरी त्यात पर्यटनाच्या अनेक गोष्टी अंतर्भूतशस्त्रागार संग्रहालय आशिया खंडातील सर्वात मोठे इंग्रजांनी भेट दिलेला कारंजा आजही इतिहासाची साक्ष देत उभा

शिवानंद फुलारी 

अक्कलकोट : येथील ऐतिहासिक राजवाडा, जागतिक पातळीवरील अग्निहोत्र केंद्र, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असा संदेश जगाला देणारे श्री स्वामी समर्थ महाराज व स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यासह तालुक्यातील अनेक धार्मिक स्थळे अक्कलकोटला नव्याने पर्यटनाच्या पटलावर आणत आहेत. 

बसस्थानक परिसरात असलेल्या नवीन राजवाडा हा जुनाच असला तरी त्यात पर्यटनाच्या अनेक गोष्टी अंतर्भूत आहेत. येथील शस्त्रागार संग्रहालय आशिया खंडातील सर्वात मोठे आहे. इंग्रजांनी भेट दिलेला कारंजा आजही इतिहासाची साक्ष देत उभा आहे. स्वामी समर्थांच्या वास्तव्याने अक्कलकोट सध्या धार्मिक पर्यटनस्थळ बनले असून, देशासह परदेशातील भाविक स्वामीचरणी लीन होण्यासाठी आणि शिवपुरी येथील अग्निहोत्र करण्यासाठी दाखल होत आहेत. बुधवार पेठेतील स्वामींचे समाधी मठ स्वामीजींची स्नानविहीर, गृह, भांडीकोंडी, पादुका आजही आहेत. राममंदिर, विठ्ठल मंदिर, मुरलीधर मंदिरही धार्मिक केंद्र बनत आहेत.

शिवपुरी येथील गजानन महाराज यांची समाधी असून, त्या ठिकाणीचे यज्ञ स्तंभ पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. येथील निसर्गोपचार केंद्र, भक्तनिवास, महाप्रसाद, याबरोबरच जागतिक अग्निहोत्र केंद्र आहे. भारत गल्लीतील गुरू मंदिरही त्याच तोडीचे आहे. तीस वर्षांपूर्वी केवळ अर्धा किलो तांदळावर चालू केलेल्या स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्य प्रदेशात पोहोचले आहे. या ठिकाणी रोज १० ते १५ हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. मंडळाच्या आवारातील शिवसृष्टी, शिवचरित्र, बागबगिचामुळे पर्यटकांचा ओघ वाढत आहे.

अक्कलकोट संत व धार्मिक भूमी आहे. पूर्वीच्या तुलनेत आता पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहर व परिसरातील देवदेवतांची मंदिरे आणखी विकसित होण्यासाठी मोठी संधी आहे. शहराजवळून जात असलेल्या महामार्गामुळे येणाºया काळात पर्यटकांमध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.-डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले प्रमुख, शिवपुरी संस्थान, अक्कलकोट

या आहेत अपेक्षा

  • - वाढत्या भाविकांच्या संख्येचा विचार करून दर्शनबारी तयार होणे, मंदिर परिसर अतिक्रमणमुक्त करणे, पालखी मार्गाचे विस्तारीकरण, हत्ती तलाव, संस्थानकालीन जिरणी तलाव, कुरनूर धरण येथे सुधारणा होणे अपेक्षित आहे.

वागदरीत परमेश्वर मंदिर

  • - गौडगाव बु।। येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर, दुधनी, अक्कलकोट, वागदरी येथील जैन मंदिर, चपळगाव येथील श्री मल्लिकार्जुन मंदिर, बºहाणपूरचे श्री सिद्धयप्पा, वागदरीतील श्री परमेश्वर मंदिर हेही धार्मिक पर्यटन केंद्र आहे. यासह अनेक हेमाडपंथी मंदिरे आहेत.;
टॅग्स :Solapurसोलापूरtourismपर्यटन