शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळपात सोलापूर तर उताऱ्यात कोल्हापूर सरस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 15:23 IST

अडचणी दूर करीत हंगामाने घेतला वेग

सोलापूर :  राज्यात ऊस गाळपाने चांगलाच वेग घेतला आहे. गाळपात सोलापूर जिल्हा राज्यात आघाडीवर असून उताऱ्यात मात्र, कोल्हापूर सरस ठरले आहे.

यंदा परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्याने साखर हंगाम सुरू होण्यासाठी काही जिल्ह्यांत अडचणी आल्या होत्या. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील साखर कारखाने १५ ऑक्टोबरपासून सुरू झाले. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील कारखाने सुरू होण्यासाठी नोव्हेंबर उजाडला.  मागील अडीच महिन्यांत ऊस गाळपाने चांगला वेग घेतला आहे. 

सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक २९ तर कोल्हापूर जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे. राज्यात गाळप सुरू असलेल्या साखर कारखान्यांची संख्या सर्वाधिक आहे. सोलापूर जिल्ह्यात मंगळवारपर्य॔ंत ९६ लाख ३७ हजार ४०२ मेट्रीक टन गाळप झाले आहे तर ८६ लाख २६ हजार ८९६ क्विंटल साखर तयार झाली आहे. साखर उतारा राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात कमी ८.९५ टक्के  इतका पडला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांनी ८६ लाख ८८ हजार २२९ मेट्रीक टन गाळप तर ९९ लाख ३८ हजार ७९४ क्विंटल साखर तयार झाली आहे. साखर उतारा राज्यात सर्वाधिक ११.४४ टक्के इतका पडला आहे. अहमदनगर जिल्ह्यात २१ साखर कारखान्यांनी ७० लाख ७ हजार तर पुणे जिल्ह्यातील १६ कारखान्यांनी ७१ लाख ३० हजार ७२२ मेट्रीक टन गाळप केले आहे. 

राज्यात सहकारी ९० तर ९२ खासगी असे १८२ साखर कारखाने सुरू असून ५ कोटी ५३ लाख ३८ हजार मेट्रीक टन इतके गाळप झाले आहे. ५४० लाख ७२ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा साखर उतारा ९.७७ टक्के इतका पडला आहे.   राज्यात खासगी ९२ साखर कारखाने सुरू असून त्यापैकी सोलापूर प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाअंर्तगत सर्वाधिक २७ तर सोलापूर जिल्ह्यात १८ व उस्मानाबाद जिल्ह्यात ८ कारखान्यांचा समावेश आहे.   साखर उतारा सोलापूर जिल्हा सर्वांत कमी ८.९५ टक्के , उस्मानाबाद ९.५ टक्के, पुणे ९.९ टक्के, सातारा जिल्ह्यात १०.४१ टक्के, सांगली ११.२२ टक्के तर कोल्हापूर ११.४४ टक्के याप्रमाणे आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखाने