शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विजय सुभाषबापूंचा झाला; मात्र दिवस ‘बाबां’ नी गाजवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 13:14 IST

Solapur South Vidhan Sabha Election Results 2019: शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघ; काँग्रेसच्या मिस्त्रींनीही दिली कडवी झुंज : देशमुखांना २९,२४७  मतांची आघाडी

ठळक मुद्देनिवडणूक निर्णय अधिकारी ज्योती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीपहिल्या दोन फेºयात सुभाष देशमुख आणि बाबा मिस्त्री आळीपाळीने आघाडीवर राहिले२३ फेºया झाल्या़ त्यात ४ फे ºयांचा अपवाद वगळता सुभाष देशमुख हेच कायम आघाडीवर

नारायण चव्हाण

सोलापूर : सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात सहकारमंत्री आणि भाजप-सेना महायुतीचे उमेदवार सुभाष देशमुख यांनी गड राखला़ प्रतिस्पर्धी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार मौलाली सय्यद तथा बाबा मिस्त्री यांचा त्यांनी २९ हजार २४७ मतांनी पराभव केला़ निवडणुकीत सुभाष देशमुख जिंकले मात्र चर्चा रंगली बाबा मिस्त्री यांना मिळालेल्या मतांची.

सकाळी सोरेगाव येथील एसआरपी कॅम्पच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीस प्रारंभ झाला़ सर्वप्रथम पोस्टल मतांची मोजणी झाली पण सर्वात शेवटी पोस्टल मतांचा निकाल जाहीर करण्यात आला़ पहिल्या दोन फेºयात सुभाष देशमुख आणि बाबा मिस्त्री आळीपाळीने आघाडीवर राहिले़ नंतर एकूण २३ फेºया झाल्या़ त्यात ४ फे ºयांचा अपवाद वगळता सुभाष देशमुख हेच कायम आघाडीवर राहिले.

शेवटच्या २३ व्या फेरीनंतर पोस्टल मतांची बेरीज करून अंतिम निकाल जाहीर करण्यात आला़ त्यात सुभाष देशमुख त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे बाबा मिस्त्री यांच्यापेक्षा २९ हजार २४७ मतांनी विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले़ सुभाष देशमुख यांना ८७ हजार २२३ तर बाबा मिस्त्री यांना ५७ हजार ९७६ मते मिळाली़ वंचित बहुजन आघाडीचे युवराज राठोड ८ हजार ५२६ मते मिळवून तिसºया क्रमांकावर राहिले.

चार फेºयात बाबा मिस्त्री आघाडीवर - दुसºया फेरीत सुभाष देशमुख यांना ३,२६१ तर बाबा मिस्त्री यांना ३,४७७ मते मिळाली़ आठव्या फेरीत देशमुख यांना ३,५९५ तर बाबा मिस्त्री यांना ३,६१८ आणि १९ व्या फेरीत देशमुख यांना १,७७० तसेच बाबा मिस्त्री यांना ४,३९१ मते मिळाली़ २० व्या फेरीत देशमुख यांना ३,२९७ तर बाबा मिस्त्री यांना ४,१७९ मते मिळाली़ या चार फेºयांमध्ये बाबा मिस्त्री यांनी मताधिक्य मिळवून भाजप गोटात धाकधूक वाढवली़ इतर सर्व फेºयांमध्ये सुभाष देशमुख आघाडीवर राहिले़

नोटाचा असाही विक्रम 

  • -  या मतदारसंघात १४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते़ सुभाष देशमुख, बाबा मिस्त्री, युवराज राठोड, अमित अजनाळकर यांच्यानंतर नोटाला अधिक मते मिळाली़ नोटाचा पाचवा क्रमांक राहिला़ १,७९३ मते नोटाला पडली.
  • पोस्टल मतातही भाजप पुढे 
  • - पोस्टलमध्ये भाजपचे सुभाष देशमुख ७८१, बाबा मिस्त्री ३०८, नागनाथ दुपारगुडे १०, युवराज राठोड ७, शिवानंद घोंगडे ११ तर बाकी सर्वजण १० पेक्षा कमी मतात राहिले़  २५० मते बाद झाली.

फोनवरून देशमुखांना अपडेटभारतीय जनता पक्षाचे दक्षिण सोलापूरचे उमेदवार सुभाष देशमुख हे मतमोजणीच्या दरम्यान केंद्राजवळ आले नाहीत़ पण भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार हे तेथे होत असलेल्या मतमोजणीचे अपडेट त्यांना फोनवरून देत होते़ दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास निवडणुकीचे पूर्ण चित्र स्पष्ट झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राजवळ घोषणा देत जल्लोष साजरा केला़ 

उमेदवारनिहाय मते 

  • सुभाष देशमुख (महायुती)     - ८७, २२३
  • मौलाली सय्यद (महाआघाडी)     - ५७, ९७६
  • नागनाथ दुपारगुडे (बसपा)     - १,८७३ 
  • अमित अजनाळकर (एमआयएम)     - २००५
  • युवराज राठोड (वंचित आघाडी)     - ८,५७९
  • श्रीशैल रणखांबे (अपक्ष)          - ३०२
  • दीपक भंडारे (अपक्ष)        - २७८
  • नानासाहेब अर्जुन  (अपक्ष)     - २३३
  • बबन कांबळे (अपक्ष)         - २६६
  • महासिद्ध गायकवाड (अपक्ष)     - २४३
  • मीनाक्षी टेळे (अपक्ष)         - ३६५
  • शिवानंद घोंगडे (अपक्ष)         -३४१
  • शेखर बंगाळे (अपक्ष)         - ८४४
  • हर्षवर्धन कमळे (अपक्ष)         - २५१ 
  • नोटा             - १७९३ 
  • पोस्टल बाद मते         - २५०
  • सुभाष देशमुख  २९,२४७ मतांनी विजयी 
टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक