शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

फौजदाराच्या मुलीवर बलात्कार करणाºया पोलिसाला १० वर्षे सक्तमजुरी, सोलापूर जिल्हा न्यायालयाचा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 11:16 IST

कविता नगर पोलीस लाईन येथे  फौजदाराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कॉन्स्टेबल लखू उर्फ लखन गायकवाड याला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा न्यायाधीश वाय. जी. देशमुख यांनी सुनावली.

ठळक मुद्देपोलीस कॉन्स्टेबल लखू उर्फ लखन गायकवाड याला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा न्यायाधीश वाय. जी. देशमुख यांनी  सुनावली.यात सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील संतोष न्हावकर, सहायक सरकारी वकील माधुरी देशपांडे तर आरोपीतर्फे  अ‍ॅड. ईस्माईल शेख यांनी काम पाहिले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १  :  कविता नगर पोलीस लाईन येथे  फौजदाराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कॉन्स्टेबल लखू उर्फ लखन गायकवाड याला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा न्यायाधीश वाय. जी. देशमुख यांनी  सुनावली.पीडित मुलीच्या आईने जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या प्रकरणी लखू गायकवाड याच्याविरुद्ध  ३७६ (२), बाललैंगिक कायद्यान्वये कलम ४ व ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीच्या सासू आजारी असल्याने त्यांच्याकडे बरेच नातेवाईक आले होते. २१ फेब्रुवारी २०१६ रोजी सायंकाळी पाच वाजता फि र्यादीची मुलगी बाहेर खेळण्यासाठी गेली होती. त्यावेळी फिर्यादीची नणंद व फिर्यादी हे अंगणात बसले असता, आरोपीच्या घरातून फिर्यादीची मुलगी रडत रडत घराबाहेर आली. आरोपीने त्यांच्या मुलीवर बलात्कार केला. पीडित मुलीवर त्यावेळी खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. त्याच दिवशी रात्री एक वाजता सहायक पोलीस निरीक्षक सुतार यांनी दवाखान्यात जाऊन फिर्याद घेतली. त्याप्रमाणे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.-------------------साक्षी ठरल्या महत्त्वाच्या ४या खटल्यात सरकारपक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पीडित मुलगी, फिर्यादी, सहायक पोलीस निरीक्षक सुतार, डॉ. गुरुराम व तपास अधिकारी डी. बी. राठोड यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून सदरील आरोपीस यापूर्वीही उस्मानाबाद जिल्हा न्यायालयाने अशाच प्रकारच्या गुन्ह्यात शिक्षा दिलेली आहे. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपी गायकवाड याला दहा वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. यात सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील संतोष न्हावकर, सहायक सरकारी वकील माधुरी देशपांडे तर आरोपीतर्फे  अ‍ॅड. ईस्माईल शेख यांनी काम पाहिले.

टॅग्स :Solapurसोलापूर