शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यानं ३ बालकांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू; एक गंभीर
2
"महात्मा गांधींना जगभरात कोणीही ओळखत नव्हतं"; पंतप्रधान मोदी असं का म्हणाले?
3
बंगाल, दिल्ली, ओडिशा अन् तेलंगणा, भाजपाला किती जागा मिळणार?; अमित शाहांनी आकडा सांगितला
4
“पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांचे अपयश अधोरेखित”; सुप्रिया सुळेंची टीका
5
लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि एनडीएला किती जागा मिळणार? योगी आदित्यनाथ यांनी थेट आकडाच सांगितला 
6
PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा!
7
T20 World Cup मध्ये रोहित ओपनर नको; भारतीय दिग्गजाचं मत, चाहत्यांनी दाखवला आरसा
8
बापरे! "जगभरात येणार कोरोनापेक्षाही भयंकर महामारी"; तज्ञांनी व्यक्त केली चिंता
9
मविआला ३५ जागा मिळतील, उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील; उबाठा गटाच्या नेत्याचा दावा
10
पाकिस्तानच्या जीडीपीच्या दुप्पट एलआयसीची संपत्ती! तीन देश मिळूनही बरोबरी करू शकत नाहीत
11
वडील शिंपी, मुलाने फी भरण्यासाठी वृत्तपत्रं विकली; कोचिंगशिवाय मिळवलं मोठं यश, झाला IAS
12
"त्या राजकीय पोस्टनंतर आईवडिलांना धमकीचा फोन आला आणि...", प्रियदर्शन जाधवने सांगितला 'तो' प्रसंग
13
चीनचं भारताविरोधात कटकारस्थान, सीमेवर वसवली ६२४ गावं, सैनिक तैनात करणार?
14
Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून लवकरच येणार; महाराष्ट्रात पावसाला सुरुवात कधी होणार?
15
पंजाबमध्ये ईडीची मोठी कारवाई, भोला ड्रग्ज प्रकरणी १३ ठिकाणी छापे
16
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
17
"याला तर तडीपार करायला हवं…"; निवडणूक निकालापूर्वी माधवी लता ओवेसींवर भडकल्या, काय घडलं?
18
Gautam Adani खरंच Paytm मध्ये हिस्सा खरेदी करणारेत का? डीलबाबत कंपनीनं दिली मोठी अपडेट
19
ब्लू, ग्रीन, व्हाईट, पिंक...; WhatsApp होणार रंगीबेरंगी, लवकरच येणार 'हे' भन्नाट फीचर
20
“काही ठिकाणी निवडणुका जिंकल्यावर काँग्रेसने EVMवर शंका घेतली नाही”; अमित शाह यांनी सुनावले

सोलापूर स्मार्ट सिटी योजनेतून आंबेडकर चौकात होणार पहिला पादचारी सिग्नल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 1:15 PM

स्मार्ट सिटी प्रकल्पातून साकारण्यात येणाºया स्मार्ट रोडवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात (पार्क चौक) पहिला पादचारी सिग्नल बसविण्याची तयारी करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देस्मार्ट सिटी प्रकल्पातून रंगभवन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत सुमारे २१ कोटी रुपये खर्चून स्मार्ट रोड करण्याचे काम प्रगतीपथावर या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटीचे सल्लागार, अधिकारी व वाहतूक पोलिसांबरोबर नुकतीच बैठकवायफाय की पोलीस आॅपरेटर बसवायचे याबाबत वाहतूक पोलिसांनी अभ्यास करून सहा महिन्यांच्या आत स्मार्ट सिटी कंपनी कार्यालयाकडे अहवाल द्यायचा आहे

राजकुमार सारोळेआॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर : स्मार्ट सिटी प्रकल्पातून साकारण्यात येणाºया स्मार्ट रोडवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात (पार्क चौक) पहिला पादचारी सिग्नल बसविण्याची तयारी करण्यात आली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पातून रंगभवन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत सुमारे २१ कोटी रुपये खर्चून स्मार्ट रोड करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या मार्गावर सध्या रंगभवन व डफरीन चौकात सिग्नल यंत्रणा आहे. रंगभवन चौकाकडून काम सुरू करण्यात आल्यामुळे या चौकातील सिग्नल बंद ठेवण्यात आले आहेत. सध्या डफरीन चौकातील सिग्नल सुरू आहेत. आगामी काळात हे काम पुढे सरकल्यावर ही सिग्नल यंत्रणा काढून टाकण्यात येणार आहे. आंबेडकर चौकात चारही बाजूने येणारे रस्ते व महापालिकेची वर्दळ लक्षात घेऊन या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविण्याचा प्रस्ताव आहे. या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटीचे सल्लागार, अधिकारी व वाहतूक पोलिसांबरोबर नुकतीच बैठक झाली. बैठकीत कंपनीचे सीईओ तथा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी सिग्नल व्यवस्था सुधारण्याचा प्रस्ताव मांडला आहे. रंगभवन व डफरीन चौकातील काम पूर्ण झाल्यावर या ठिकाणी कॅन्टिलिव्हर सिग्नल बसविण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात स्मार्ट सिटीतील पहिला पादचाºयांसाठी सिग्नल बसविण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. मनपा, हुतात्मा सभागृह, सिद्धेश्वर मंदिर, पार्क स्टेडियम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बाजारपेठ, शाळांकडे येणाºयांची वर्दळ जास्त असते. यात पादचाºयांची संख्या जास्त असते. पादचाºयांना रस्ता ओलांडण्यासाठी इमर्जन्सी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. एकाचवेळी समूहाने रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी आल्यावर बटन दाबून चारही बाजूचे सिग्नल बंद करता येण्यासारखी सुविधा देण्यात येणार आहे. हे सिग्नल मॅन्युअली बसवायचे, वायफाय की पोलीस आॅपरेटर बसवायचे याबाबत वाहतूक पोलिसांनी अभ्यास करून सहा महिन्यांच्या आत स्मार्ट सिटी कंपनी कार्यालयाकडे अहवाल द्यायचा आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका