शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
11
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

सोलापूर सिध्देश्वर यात्रा ; शेटे वाड्यामध्ये संबळाच्या निनादात थोबडे नवदाम्पत्याकडून योगदंड पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 13:22 IST

सोलापूर : अठरा दिवसांपूर्वी विवाहबद्ध झालेले अ‍ॅड. रितेश मिलिंद थोबडे आणि त्यांची पत्नी श्रद्धा या नवदाम्पत्याने शुक्रवारी स्व. रामचंद्रप्पा ...

ठळक मुद्देकेळीच्या पानावर योगदंडास नैवेद्य दाखविण्यात आला़अक्षता सोहळ्याच्या आधी नववधू-वरांना पाहुण्यांच्या घरी बोलावून जेवण घालण्याची प्रथा

सोलापूर : अठरा दिवसांपूर्वी विवाहबद्ध झालेले अ‍ॅड. रितेश मिलिंद थोबडे आणि त्यांची पत्नी श्रद्धा या नवदाम्पत्याने शुक्रवारी स्व. रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात संबळाच्या निनादात अन् मंत्रोच्चारात ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाची विधिवत पूजा केली. या पूजनाने यात्रेतील धाििर्मक विधींना प्रारंभ होणार आहे. रविवारच्या तैलाभिषेकापासूनने यात्रा सुरू होणार आहे.

अक्षता सोहळ्याच्या आधी नववधू-वरांना पाहुण्यांच्या घरी बोलावून जेवण घालण्याची प्रथा, परंपरा आहे़ शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मानकरी शिवशंकर कंठीकर हे उत्तर कसब्यातील शिवानंद हिरेहब्बू यांच्या वाड्यातून सिद्धेश्वरांच्या हातातील योगदंड कै. शेटे यांच्या वाड्यात घेऊन आले़ त्यानंतर सागर हिरेहब्बू, सुरेश हब्बू, मनोज हब्बू, तम्मा हब्बू, सदानंद हब्बू, राजेश हब्बू, विश्वनाथ हब्बू हे शेटे वाड्यात आल्यानंतर योगदंडाला चौरंगी पाटावर ठेवून, विभूती, कुंकूम, फुले वाहून संबळाच्या निनादात काही विधी पार पडले. यावेळी अ‍ॅड़ रितेश थोबडे, श्रद्धा रितेश थोबडे यांनी हिरेहब्बू, हब्बू मंडळींची पाद्यपूजा केली.

केळीच्या पानावर योगदंडास नैवेद्य दाखविण्यात आला़ पूजा सोहळ्यात माजी नगरसेविका विजयाताई थोबडे, महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. मिलिंद थोबडे, सुचेता थोबडे, ललिता थोबडे, राजश्री देसाई, मल्लिका थोबडे, वंदना बगली, रोहन बगली (विजयपूर, कर्नाटक), माजी नगरसेवक महेश थोबडे, सिद्धेश थोबडे आदी सहभागी झाले होते. 

यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, देवस्थान पंच कमिटीचे सदस्य गुंडप्पा कारभारी, अ‍ॅड. राजेंद्र घुली, मल्लिनाथ जोडभावी, मानकरी सुधीर देशमुख, सिद्धेश्वर बँकेचे माजी अध्यक्ष सुभाष मुनाळे, सुधीर थोबडे, प्रतीक थोबडे, आप्पासाहेब वांगी, तम्मा शेटे, अ‍ॅड. विनोद सोमवंशी, अ‍ॅड. राजकुमार मात्रे आदी उपस्थित होते. पूजा पार पडल्यावर पारंपरिक प्रसादाचा आस्वाद भक्तगणांनी घेतला. 

कर्नाटकातील विजयपूर हे माझे माहेर. २४ डिसेंबरला विजयपूर येथे झालेल्या लग्नसोहळ्यात मी अ‍ॅड. रितेश थोबडे यांच्याशी विवाहबद्ध झाले. आज या घराची एक सून म्हणून मला पहिल्यांदाच योगदंडाच्या पूजनात सहभागी होता आले. ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांनी थोबडे कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्याने माझा संसार सुखाचा, आनंदाचा जावा, हीच सिद्धरामेश्वर चरणी प्रार्थना करते.- श्रद्धा रितेश थोबडे

घरातील लग्नाप्रमाणे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेची आम्ही तयारी करतो. खास यासाठी चटणी कांडतो. योगदंडाच्या पूजेसाठी विविध प्रकारच्या १६ भाज्या बनवून श्री सिद्धरामेश्वरांना महानैवेद्य दाखविण्यात येते.त्यानंतरच आम्ही प्रसाद सेवन करतो. हा सोहळा दरवर्षी लवकर-लवकर यावा, असे आम्हाला सतत वाटत राहते. ही सर्वधर्मीय सलोख्याचे संबंध जोपासणारी यात्रा आहे. - सुचेता मिलिंद थोबडे

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Siddheshwar Yatraसोलापूर सिद्धेश्वर यात्राSiddheshwar Templeसिध्देश्वर मंदीर