शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर सिध्देश्वर यात्रा ; नंदीध्वज मिरवणूक मार्गावरील मंदिरेही आकर्षक दीपमाळांनी होणार प्रकाशमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 15:21 IST

सोलापूर : ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त घरांवर, दुकानांवर विद्युत रोषणाई करण्याबाबत वीरशैव व्हिजनने हाती घेतलेल्या जनजागृती मोहिमेत अनेक ...

ठळक मुद्देमार्कंडेय, लक्ष्मीनारायण, आजोबा, बालाजी मंदिर विश्वस्तांचा पुढाकारसिद्धरामेश्वर गड्डा यात्रा जशी जवळ येत आहे, तसा सोलापूरकर भक्तांमध्ये उत्साह वाढत आहेमागील १५ ते २० वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून यंदा यामध्ये वेगळेपणा आणण्याचा विचार

सोलापूर : ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त घरांवर, दुकानांवर विद्युत रोषणाई करण्याबाबत वीरशैव व्हिजनने हाती घेतलेल्या जनजागृती मोहिमेत अनेक सामाजिक संस्था सहभागी होत आहेत. नंदीध्वज मिरवणूक मार्गावरील सर्व घरांवर विद्युत रोषणाईचा झगमगाट दिसणार आहे. मार्गावरील आजोबा गणपती, मार्कंडेय मंदिर, चाटी गल्लीतील बालाजी मंदिर व लक्ष्मीनारायण मंदिर, कसबा गणपती मंदिर विद्युत दिव्यांच्या सजावटीने प्रकाशमान होणार आहे.

सिद्धरामेश्वर गड्डा यात्रा जशी जवळ येत आहे, तसा सोलापूरकर भक्तांमध्ये उत्साह वाढत आहे. यंदा यात्रा परंपरेप्रमाणे घरोघरी दिवाळीप्रमाणे दिवे लावण्यासोबत विद्युत रोषणाईने घरे, इमारती सजविण्याची लगबग सुरू आहे. सोलापूरच्या प्रसिद्ध आजोबा गणपती ट्रस्टमार्फत माणिक चौक ते कालिका मंदिरपर्यंत  रस्त्याच्या दुतर्फा विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. मागील १५ ते २० वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून यंदा यामध्ये वेगळेपणा आणण्याचा विचार आहे, असे  उपाध्यक्ष चिदानंद वनारोटे यांनी सांगितले. आजोबा गणपतीसमोर यात्रेतील सातही नंदीध्वजांचे पूजन करण्यात येते. अध्यक्ष गौरीशंकर फुलारी, सेक्रेटरी अनिल सावंत, चंद्रकांत कळमणकर, गवसने अप्पा, आप्पासाहेब म्हंता, सातलिंग दुधनीकर हे ट्रस्टचे सदस्य नवीपेठ, दत्त मंदिर ते सिद्धेश्वर मंदिरापर्यंत सर्व भक्त व दुकानदारांनी आपला परिसर विद्युत रोषणाईने सजावट  करण्यासोबत दीपोत्सवाने नंदीध्वजांचे स्वागत करावे असे आवाहन केले.

पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनीचे मंदिर हे मिरवणूक मार्गावरील महत्त्वाचे स्थान आहे. मंदिरासमोर बुट्टे घराण्यातर्फे विसावा असून,  यात्रा मिरवणुकीतील चारही दिवस या ठिकाणी सातही नंदीध्वज एकत्र येतात. मार्कं डेय मंदिरावर व परिसरात विद्युत रोषणाई करण्यात येते, असे सरचिटणीस सुरेश फलमारी यांनी सांगितले. यात्रेच्या मिरवणुकीत नंदीध्वजांचे पूजन व स्वागत पद्मशाली समाजाच्या वतीने करण्यात येते. तर अक्षता सोहळ्यास जाताना मानकरी हिरेहब्बू यांच्याकडून मार्कंडेय महामुनीची आरती होते.

माहेश्वरी समाजातर्फेही रोषणाई- वीरशैव व्हिजन, ‘लोकमत’च्या आवाहनाला प्रतिसाद देत माहेश्वरी व मारवाडी समाजाच्या वतीने चाटी गल्ली येथील बालाजी मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात येणार असल्याचे सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभाचे अध्यक्ष चंद्रकांत तापडिया व सचिव जवाहर जाजू यांनी सांगितले. १६ डिसेंबर ते १४ जानेवारी मारवाडी समाजात मोठ्या उत्साहात  धनुर्मास उत्सव साजरा केला जातो. याच काळात सिद्धरामेश्वरांची यात्रा असते. मारवाडी समाजाची ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांवर अपार भक्ती असून यात्रेत कुटुंबासह सहभागी होतात.

कसब्यात घराघरांवर रोषणाई- कसबा येथील मल्लिकार्जुन मंदिर परिसरातील हिरेहब्बू वाड्यापासून मिरवणूक सुरू होते. येथील कसबा गणपती मंडळाच्या वतीने मंदिरासह बाळीवेस परिसरात मिरवणूक मार्गावर पंधरा वर्षांपासून विद्युत रोषणाई करण्यात येते. मानकºयांच्या  घरी दिवेलावणीसोबत घरोघरी विद्युत रोषणाई करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा मनोदय अध्यक्ष सोमनाथ भोगडे, मल्लिनाथ खुने, केदार मेंगाणे, चिदानंद मुस्तारे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Siddheshwar Yatraसोलापूर सिद्धेश्वर यात्राSiddheshwar Templeसिध्देश्वर मंदीरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका