शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
5
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
6
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
7
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
8
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
9
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
10
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
11
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
12
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
13
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
14
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
15
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
16
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
17
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
18
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
20
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला

सोलापूर सिध्देश्वर यात्रा ; मैदानावर यंदा म्हणे ओन्ली ‘होम’; जनावरांसाठी लक्ष्मी-विष्णू मिल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 12:13 IST

महापालिकेच्या भूमिकेकडे लक्ष : बदलत्या ‘स्मार्ट सिटी’त नवे निर्णय घेण्यावर भर

ठळक मुद्देयात्रेच्या नियोजनाबाबत महापालिका प्रशासनासोबत चर्चा सुरूस्मार्ट सिटी योजनेतून होम मैदानावर मनोरंजनासाठी ७० एमएमचा स्क्रीन लावण्याचा विचार

सोलापूर : ग्रामदैवत सिध्देश्वरांच्या यात्रेनिमित्त गेली अनेक वर्षे रेवणसिध्देश्वर मंदिरासमोरील पटांगणात भरणारा जनावरांचा बाजार यंदा लक्ष्मी-विष्णू मिलच्या जागेत भरविण्यात यावा, असा पर्याय महापालिका प्रशासनाने सिध्देश्वर देवस्थान पंचकमिटीसमोर ठेवला    आहे. होम मैदानावर पूजा-अर्चा व्हावी, मनोरंजन किंवा बाजारासाठी शहरातील इतर जागा आहेतच, असे मतही मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी नोंदविले. 

सिध्देश्वर यात्रेच्या निमित्ताने महापालिका आणि देवस्थान पंचकमिटीमध्ये चर्चेच्या फेºया सुरू आहेत. पंचकमिटीच्या सदस्यांनी बुधवारी सकाळी मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेतली. होम मैदानाचे पूर्वीचे रुप आणि आताचे रुप बदललेले आहे. त्यामुळे यंदा महापालिका प्रशासन मैदानाचे हस्तांतरण करताना काही निर्बंध लादणार असल्याची चर्चा आहे. याबाबत आयुक्त डॉ. ढाकणे म्हणाले, मैदानावर धार्मिक विधी व्हायला हवेत. मनोरंजन किंवा दुकानांसाठी शहरातील इतर जागा आहेत. 

काळानुसार बदल झाला पाहिजे. कायदे आणि नियम पाळून यात्रा झाली पाहिजे. सध्या केवळ चर्चा सुरू आहे. जनावरांच्या बाजारासाठी लक्ष्मी-विष्णू मिलच्या जागेचा पर्याय आहे. ही जागा पाहून घ्या, असे देवस्थान समितीला सांगण्यात आलेले आहे. प्राणी संग्रहालयामुळे या भागात बाजार भरविता येणार नाही. 

मैदानावर ७० एमएमचा स्क्रीन लावणार- होम मैदान हे खेळासाठी होते हे आपण विसरुन आहोत, असे सांगून आयुक्त डॉ. ढाकणे म्हणाले, स्मार्ट सिटी योजनेतून होम मैदानावर मनोरंजनासाठी ७० एमएमचा स्क्रीन लावण्याचा विचार आहे. सोलापूर डेव्हलपमेंट कॉर्पाेरेशनच्या २० डिसेंबरला होणाºया बैठकीत या कामाला मंजुरी घेण्यात येईल. या स्क्रीनवर धार्मिक कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम पाहता येतील. 

प्राणी संग्रहालयापासून ५०० मीटर अंतरापर्यंत जनावरांचा बाजार भरवू नये, असे नियम राष्टÑीय चिडीयाघर प्राधिकरणाने घालून दिले आहेत. सोलापूरच्या जनावरांच्या बाजारात कर्नाटकातूनही जनावरे येतात. हिवाळ्यामध्ये या जनावरांना पायखुरी, तोंडखुरीसारखे आजार होण्याची शक्यता असते. या जनावरांचे इन्फेक्शन त्यांच्या मालकालाही होऊ शकते. प्राणी संग्रहालयात काळवीट, सांबर, चितळ आदी प्राणी आहेत. त्यांना या जनावरांकडून किंवा मालकाकडून पायखुरी, तोंडखुरीसारख्या आजारांची बाधा होऊ शकते. त्यामुळे आम्ही प्राणी संग्रहालयाजवळ जनावरांचा बाजार भरवू नये, असे पत्र महापालिका आयुक्तांना दिले आहे. बाजार भरला तर ते कायद्याचे उल्लंघन होईल. - डॉ. शुभांगी ताजणे, प्राणी संग्रहालय प्रमुख. 

यात्रेच्या नियोजनाबाबत महापालिका प्रशासनासोबत चर्चा सुरू आहे. जनावरांचा बाजार किंवा होम मैदान याबाबत आताच काही बोलणे योग्य होणार नाही. - बाळासाहेब भोगडे, सदस्य, देवस्थान पंचकमिटी. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय