शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

सोलापूर सिध्देश्वर यात्रा ; शहराच्या पंचक्रोशीत पूजनाची लगबग, दुचाकीवरून नंदीध्वज निघाले गावोगावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 14:03 IST

सोलापूर : ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील योगदंडाचे प्रतीक असलेले नंदीध्वज पेलण्याचा सराव अंतिम टप्प्यात आला आहे. यात्रेच्या अगोदर आपल्या घरी ...

ठळक मुद्देदररोज ६० ते ७० पूजा : दोन, कधी तीन मोटरसायकलवरून नेल्या जातात पूजेच्या काठ्याकुंभारी, कोन्हाळीपासून मंगळवेढ्यापर्यंत असते पूजेचे निमंत्रणशहरात १८ सराव नंदीध्वज असून दररोज ग्रामीण भागासह जवळपास ६० ते ७० ठिकाणी पूजन

सोलापूर : ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील योगदंडाचे प्रतीक असलेले नंदीध्वज पेलण्याचा सराव अंतिम टप्प्यात आला आहे. यात्रेच्या अगोदर आपल्या घरी नंदीध्वज पूजनासाठी यावेत अशी प्रत्येक भक्तांची इच्छा असते. सोलापूर शहर परिसरातील गावोगावी हे नंदीध्वज मोटरसायकलवरून पूजनासाठी घेऊन जातानाचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.

 शहर विस्तारीकरणासोबत विभक्त झालेल्या कुटुंबांची वाढती संख्या व प्रत्येक कुटुंबाची  ग्रामदैवतावरील श्रद्धा यामुळे यंदा यात्रेतील सराव नंदीध्वजांचे पूजन यंदा लवकरच सुरू झाले आहे. दरवर्षी कार्तिक अमावस्येला मल्लिकार्जुन मंदिरातील सराव काठी पूजनानंतर घरोघरी व परिसरातील ग्रामीण भागातील भक्तांकडे पूजनाला सुरुवात होत असे. यंदा दहा-पंधरा दिवस अगोदरच काठी पेलण्याचा सराव आणि  पूजनासही सुरुवात झालेली दिसत आहे. 

यात्रा जवळ येते तशी पूजा करणाºयांची संख्या वाढत जाते. शहरातील पूजनासोबत ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात पूजा होतात. दिवसभर पूजेसाठी असलेल्या काठ्या रात्री उशिरा सरावासाठी उपलब्ध होतात. यामुळे नंदीध्वज धारकांची दमछाक होत आहे. वाढत्या पूजांमुळे एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी नंदीध्वज मोटरसायकलवरून घेऊन जावे लागतात. मागील दोन-तीन वर्षांपासून अशा प्रकारे नंदीध्वज वाहून नेण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्याचे पालन पूर्णत: होत नसले तरी काठी घेऊन जाताना भक्तांकडून होणारी आरडाओरड, गोंधळ जवळपास बंद झाला आहे.

शहरात नंदीध्वज खांद्यावर वाहून नेले जातात; मात्र ग्रामीण भागात  मोटरसायकलवरून नेण्याशिवाय पर्याय नाही.  शहराबाहेरील तुळजापूर रोडवर हिप्परगा, एकरुख, उळे येथे पहिले व दुसरे सराव नंदीध्वज जाताना दिसून आले. तर माळी समाजाची तिसरी सरावकाठी अक्कलकोट रोडवर कुंभारी, वळसंग भागात फिरत होती. रविवारी पहाटेच्या  कुडकुडत्या थंडीत गर्द धुक्यातून वाट काढत कुंभारीच्या गेनसिद्ध मंदिराकडे जाणाºया चौथ्या सराव काठीचे भक्तगण दिसले.

कुंभारी, कोन्हाळीपासून मंगळवेढ्यापर्यंत असते पूजेचे निमंत्रण- शहराजवळील ग्रामीण भागात अक्कलकोट रोडवरील कुंभारी, कोन्हाळी, तोगराळी, हणमगावपासून ते वळसंगपर्यंत तुळजापूर रोडवर हिप्परगा, उळे, एकरुख,कासेगाव ते तामलवाडीपर्यंत, होटगी रोडवर कुमठे, हतुरेवस्ती, होटगी, आहेरवाडी, बंकलगी परिसरात पुणे रोडवरील बाळे, केगाव, कोंडी परिसरात पूजेला जातात. देगाव रोडवर बेगमपूर, माचणूर, मंगळवेढ्यापर्यंत भाविकांची पूजनासाठी मागणी असते. 

शहरात पूजनाचे १८ नंदीध्वज- नंदीध्वज ३० ते ३५ फूट लांबीचे असतात. वजन १०० ते १२५ किलो असते. दुचाकी गाडीवरून नेताना खेळणा पुढच्या बाजूस तर गुडी मागच्या बाजूस असते. प्रत्येक दुचाकीवर एक चालक व दोघे काठी धरतात. काही वेळेस मध्यभागी तिसरी गाडीसुद्धा वापरून काठी वाहून नेतात. शहरात १८ सराव नंदीध्वज असून दररोज ग्रामीण भागासह जवळपास ६० ते ७० ठिकाणी पूजन करण्यात येत आहे.

वाढत्या पूजा व ग्रामीण भागातील भक्तांना पूजेची सेवा मिळावी यासाठी लांब अंतर असलेल्या ठिकाणी मोटरसायकलवरून काठी वाहून नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. सिद्धेश्वर महाराजांचा जयजयकार करीत, डोक्यावर टोपी घालून, गोंधळघाई न करता काठी वाहून नेली जाते, याचे समाधान वाटते. - राजशेखर हिरेहब्बू, मानकरी, नंदीध्वज 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Siddheshwar Yatraसोलापूर सिद्धेश्वर यात्राSiddheshwar Templeसिध्देश्वर मंदीर