शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

Solapur Siddeshwar Yatra ; यंदाही रस्ता मोकळाच, पाळणे, स्टॉल्स होम मैदानावरच ; मात्र कंपाउंडला धक्का लागल्यास नुकसानभरपाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 10:59 IST

यात्रा सिद्धरामांची : पंचकट्टा कार्यालयाचा विधिवत शुभारंभ; स्टॉल बुकिंगला सुरुवात

ठळक मुद्देभगवा ध्वज फडकावून होम मैदान ३१ जानेवारीपर्यंत पंच कमिटीच्या ताब्यात पंचकट्टा कार्यालयाच्या शुभारंभानंतर स्टॉल्स बुकिंगला सुरुवात दोन दिवसांमध्ये पंचकट्टा परिसर, होम मैदानावरील स्टॉल्सचा आराखडा तयार होईल

सोलापूर : जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे असताना आपत्कालीन रस्ता मोकळा सोडण्याची अट यंदाही पंचकमिटी पाळणार असून, होम मैदानावरच पाळणे, स्टॉल्स असणार आहेत, हे स्पष्ट करताना श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी होम मैदानाच्या भोवताली असलेल्या कंपाउंडला धक्का लागल्यास नुकसानभरपाईची जबाबदारीही स्वीकारली. 

सोमवारी सकाळी १०.३० वाजता सिद्धेश्वर पेठेतील ६८ पैकी ५० वे सर्वेश्वर लिंगाची आणि ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या प्रतिमेचे धर्मराज काडादी, गुंडप्पा कारभारी यांच्या हस्ते पूजा करुन पंचकट्टा कार्यालयाचा शुभारंभ केला. त्यानंतर भगवा ध्वज फडकावून होम मैदान ताब्यात घेतले. त्यावेळी काडादी पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी पंच कमिटीचे सदस्य तथा यात्रा कमिटीचे अध्यक्ष बाबुराव नष्टे, सदस्य बाळासाहेब भोगडे, सिद्धेश्वर बमणी, गिरीष गोरनळ्ळी, मल्लिकार्जुन कळके,  वेदमूर्ती बसवराज शास्त्री, अश्विन स्वामी, चिदानंद स्वामी, विश्वनाथ लब्बा, चिदानंद वनारोटे, काशिनाथ दर्गोपाटील, शिवकुमार पाटील, गौरीशंकर डुमणे, बसवराज अष्टगी, सुरेश म्हेत्रे, संतोष बाणेगाव, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुदीप चाकोते, शिवसेनेचे शाहू शिंदे आदी भक्तगण उपस्थित होते. 

पंचकट्टा येथील कार्यालयाच्या शुभारंभानंतर पंच कमिटीचे सदस्य, मानकरी, भक्तगण होम मैदानाकडे रवाना झाले. स्मार्ट सिटी अंतर्गत होम मैदानाच्या चोहोबाजूनी संरक्षक भिंत आणि ८ प्रवेशद्वार उभे करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीसमोरील गेटचे धर्मराज काडादी यांच्या हस्ते पूजन झाले. त्यानंतर प्रवेशद्वार उघडताच काडादी यांच्यासह सदस्य, भक्तगणांनी पाऊल ठेवले. 

भगवा ध्वज फडकावून होम मैदान ३१ जानेवारीपर्यंत पंच कमिटीच्या ताब्यात मिळाल्याचे जणू संकेत मिळाले. 

पंचकट्टा कार्यालयाच्या शुभारंभानंतर स्टॉल्स बुकिंगला सुरुवात होते. दोन दिवसांमध्ये पंचकट्टा परिसर, होम मैदानावरील स्टॉल्सचा आराखडा तयार होईल. आराखड्याचे काम वास्तुविशारद ऋषीकेश पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे.-बाळासाहेब भोगडे, अध्यक्ष- यात्रा स्टॉल समिती 

कमिटी काळजी घेईल- होम मैदानावरील प्रवेशद्वाराचे पूजन झाले. स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या सुशोभीकरणानंतर धर्मराज काडादी यांच्यासह पंच कमिटीच्या सदस्यांनी पहिलेच पाऊल होम मैदानावर टाकले. होम मैदानाच्या सुशोभीकरणाला कुठे बाधा होणार नाही, याची काळजी पुरेपूर पंच कमिटी घेईल, असे सांगताना धर्मराज काडादी यांनी पाळणे, इतर स्टॉल होम मैदानावरच असतील, याचे स्पष्टीकरण दिले. 

होम मैदान उजळणार !- स्मार्ट सिटी अंतर्गत रंगभवन आणि होम मैदानाच्या सुशोभीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सध्या होम मैदानाच्या भोवताली संरक्षक भिंत बांधण्यात आली असून, त्यावरील लोखंडी ग्रीलवर दिवे बसविण्यात आले आहेत. यामुळे यात्रा काळात होम मैदान लख-लख दिव्यांनी उजाळणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSiddheshwar Templeसिध्देश्वर मंदीर