शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: सहा ठिकाणच्या वाळू उपशासाठी २७ निविदा प्राप्त, गुरसाळेसाठी फक्त एक निविदा आल्याने पुन्हा निविदा

By संताजी शिंदे | Updated: June 21, 2023 17:25 IST

Solapur: शासनाच्या वाळू धोरणानुसार भीमा नदी च्या पात्रातील सहा ठिकाणच्या वाळू उपशासाठी २७ निविदा प्राप्त झाल्या आहेत. मात्र पंढरपुरातील गुरसाळे येथील उपशासाठी फक्त एकच निविदा आल्याने त्यासाठी पुन्हा निविदा काढण्यात येणार आहे.

- संताजी शिंदे सोलापूर - शासनाच्या वाळू धोरणानुसार भीमा नदी च्या पात्रातील सहा ठिकाणच्या वाळू उपशासाठी २७ निविदा प्राप्त झाल्या आहेत. मात्र पंढरपुरातील गुरसाळे येथील उपशासाठी फक्त एकच निविदा आल्याने त्यासाठी पुन्हा निविदा काढण्यात येणार आहे.

१९ एप्रिलच्या शासन निर्णयानुसार राज्यातील पूर परिस्थितीचा धोका कमी करण्यासाठी गाळमिश्रित वाळू काढण्यासाठी भीमा नदीच्या पात्रातील सहा जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. निश्चित केलेल्या वाळू उपशासाठी जिल्हा प्रशासनाकडून ऑनलाइन निविदा मागवण्यात आल्या होत्या. ९ जून २०२३ रोजी उघडण्यात आल्या तेव्हां चळे (ता.पंढरपूर), उचेठाण, जांभूड (ता. मंगळवेढा) या ठिकाणच्या वाळू उपशासाठी फक्त प्रत्येकी एक निविदा आली होती. जिल्हा प्रशासनाने निविदा मागवण्यासाठी १६ जूनपर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र त्या दिवशी सर्व्हर डाऊन असल्याने निविदा पाहता आल्या नाहीत.

प्रशासनाने पुन्हा १९ जूनपर्यंत मुदतवाढ दिली होती. सोमवारी सायंकाळी ऑनलाइन निविदा पाहिल्यानंतर त्यात वाढ झालेले दिसून आले. मौजे. चळे (ता. पंढरपूर) साठी ०६, मौजे उचेठाण (मंगळवेढा)-०७, मौजे. जांभूड (ता.माळशिरस)-०७, मौजे. उंबरे वेळापूर (ता.माळशिरस)-०३, मौजे. वाफेगाव (ता.माळशिरस)-०३ व मौजे. गुरसाळे (ता.पंढरपूर)-०१ अशा निविदा प्राप्त झाल्या आहेत. गुरसाळेसाठी एकच निविदा आल्याने तेथील उपशासाठी पुन्हा २६ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने ३ जून रोजी वाळू उपशाबाबत निविदा प्रसिद्ध केली हाेती. सुरुवातीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मुदत वाढवून दिल्यानंतर निविदांच्या संख्येत वाढ झाली.

शासन निर्णयानुसार मागवण्यात आलेल्या वाळू उपशासाठी निविदा प्राप्त झाल्या आहेत. गुरसाळे येथे एकच निविदा आल्याने ते देता येत नाही. प्राप्त झालेल्या अन्य निविदाधारकांची तांत्रिक तपासणी केल्यानंतर पुढील दोन दिवसात पुढील कारवाई केली जाईल.- दिव्या वर्मा, जिल्हा खनिकर्म अधिकारी.

कोणत्या ठिकाणी किती वाळू उपसा?गावे                         ब्रास१) चळे (पंढरपूर)-             १४ हजार १३४२) उचेठाण (मंगळवेढा) ८ हजार ४००३) जांभूड (माळशिरस) ८ हजार४) उंबरे वेळापूर (माळशिरस) पाच हजार५) वाफेगाव (माळशिरस) पाच हजार ५००६) गुरसाळे (पंढरपूर)             ९ हजार

टॅग्स :Solapurसोलापूर