शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
2
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
3
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
4
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
5
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
6
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
7
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
8
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
9
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
10
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
11
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
12
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
13
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
14
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
15
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
16
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
17
सामुद्रिक शास्त्र: शरीराच्या कुठल्या भागावर 'तिळ' आहे, त्यानुसार समुद्र शास्त्र सांगते तुमचे भाकीत!
18
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
20
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

चेन्नई एक्स्प्रेसमध्ये मद्यपि तृतीयपंथीयाचा उच्छाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 12:47 IST

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील घटना ; अश्लील भाषेतील शब्दप्रयोग करताना प्रवाशांना झालाय नाहक त्रास

ठळक मुद्देभरपूर दारू ढोसलेल्या या तृतीयपंथीयाने सोलापूर स्थानकावरुन सर्वसाधारण डब्यात प्रवेश केलाडब्यात चढल्यापासून तो विचित्र हावभाव करताना प्रवाशांशी अश्लील संभाषण करताना जबरदस्तीने पैसे मागू लागलाउन्हाळी सुटीनिमित्त सध्या सर्वच रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल धावत आहेत

कुर्डूवाडी : चेन्नई-मुंबई एक्स्प्रेसमध्ये एका मद्यपि तृतीयपंथीयाने अक्षरश: उच्छाद मांडत प्रवाशांना वेठीस धरले. अश्लील भाषेतील शब्दप्रयोग करताना प्रवाशांना नाहक त्रास होत असताना ड्यूटीवरील रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी काहीच करू शकले नाहीत. भरपूर दारू ढोसलेल्या या तृतीयपंथीयाने सोलापूर स्थानकावरुन सर्वसाधारण डब्यात प्रवेश केला. डब्यात चढल्यापासून तो विचित्र हावभाव करताना प्रवाशांशी अश्लील संभाषण करताना जबरदस्तीने पैसे मागू लागला. कोणी रुपया-दोन रुपये दिले अथवा पाच रुपये... तर तो न घेता जादा पैशाची मागणी करू लागला. काही प्रवासी संतप्त झाले; मात्र त्याच्या प्रकारापुढे नतमस्तकही होताना दिसत होते. एका प्रवाशाला त्याच्या शिव्याशापापासून सुटका होण्यासाठी त्याचे पायही धरावे लागले. प्रत्येक डबा आणि डब्यातील प्रत्येकाकडून जणू तो पैसे घेऊनच पुढे जात होता. उन्हाळी सुटीनिमित्त सध्या सर्वच रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल धावत आहेत. एका डब्यातून तृतीयपंथीय दीड ते दोन हजार रुपये गोळा करीत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. काही जण परिवारासमवेत प्रवेश करीत होते. कुटुंबातील सदस्य असतील तर त्या कुटुंब प्रमुखाला या तृतीयपंथीयाने अक्षरश: वेठीसही धरले. परिवारातील सदस्यांचे तोंड पाहून जो-तो ५० ते १०० रुपयेही त्याच्या हातात टेकवितानाही चित्र दिसत होते. काही प्रवाशांकडे पैसे नव्हते अथवा सुटे पैसे नव्हते. अशांनाही त्याने सोडले नाही. कोणी पैसे देण्यास नकार दिला तर त्यांच्या खिशात हात घालून अक्षरश: या तृतीयपंथीयाने जणू लूटच केली. सर्वच डब्यांमध्ये हा प्रकार घडत असताना लोहमार्ग, आरपीएफ जवान आणि रेल्वेचे संबंधित अधिकारी, कर्मचारी मात्र मूग गिळून गप्प होते. प्रवाशांना नाहक होणारा त्रास बंद व्हावा, यावर रेल्वे पोलीस व प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे. या बरोबरच अवैध व्हेंडरचा त्रासही होतो. पाणी व खाद्यपदार्थांसाठी अव्वाच्या सव्वा पैसे घेतले जातात. याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी व प्रवाशांची यातून सुटका करावी. -संजय टोणपे, अध्यक्ष, सोलापूर पुणे प्रवासी संघटना. रेल्वे प्रवाशांना अशा तृतीयपंथीयांचा नेहमीच त्रास होतो. आजपर्यंत अशांवर कारवाई करण्यासाठी रेल्वे प्रशासन, आरपीएफ आणि लोहमार्ग पोलीस कधीच ठोस पावले उचलली नाहीत. तृतीयपंथीयांचा कायमस्वरुपी बंदोबस्त होण्याची गरज आहे. - गंगाधर वळदड्डे,

टॅग्स :Solapurसोलापूरcentral railwayमध्य रेल्वेrailwayरेल्वे