शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Solapur: पोलीस असल्याची बतावणी करुन सोन्याच्या बांगड्या घेऊन गेले, सराफ बाजारात धक्कादायक प्रकार

By विलास जळकोटकर | Updated: November 23, 2023 18:11 IST

Solapur News: पोलिस असल्याची बतावणी करीत दोघेजण सराफ दुकानात शिरले. त्यांनी लहान मुलांची अंगठी घेण्याचे कारण सांगत ड्राव्हरमधील साधारण २ लाख ३२ हजार रुपयांच्या सोन्याच्या चार बांगड्या घेऊन पसार होण्याचा धक्कादायक प्रकार पूर्व मंगळवारपेठेतील सराफ बाजारामध्ये घडला.

- विलास जळकोटकर सोलापूर  - पोलिस असल्याची बतावणी करीत दोघेजण सराफ दुकानात शिरले. त्यांनी लहान मुलांची अंगठी घेण्याचे कारण सांगत ड्राव्हरमधील साधारण २ लाख ३२ हजार रुपयांच्या सोन्याच्या चार बांगड्या घेऊन पसार होण्याचा धक्कादायक प्रकार पूर्व मंगळवारपेठेतील सराफ बाजारामध्ये घडला. या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. विलास उद्धवराव वेदपाठक (वय- ३५, रा. काटगाव, ता. तुळजापूर) यांनी फिर्याद दिली आहे.शहरामधील सराफ बाजारात शुक्रवारच्या साधारण ३:४० च्या सुमारास दोघे अनोळखी व्यक्ती विलास उद्धवराव वेदपाठक यांच्या पूर्व मंगळवार पेठेतील मनोज ज्वेर्ल्स या दुकानात आले. त्यांनी आपण पोलिस आहोत असे त्यांना सांगितले. लहान मुलासाठी अंगठी घ्यायची आहे म्हणून त्यांनी दाखवण्या सांगितले. या दरम्यान, त्यांनी ड्रॉव्हरमधील ४०.७५० ग्रॅम वजनाच्या ९१६ होलमार्कच्या ४ सोन्याच्या बांगड्या पाहिल्या. वेदपाठक यांच्या नकळत त्या घेतल्या आणि निघून गेले.

चार-पाच दिवसांनंतर सराफ व्यापारी वेदपाठक यांच्या लक्षात ही बाब आली. एवढ्या मोठ्या रक्कमेचा फटका बसल्याने त्यांना चैन पडेना. त्यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदविली. पुढील तपास सपोनि पवार करीत आहेत.

सराफ बाजारात खळबळयाच महिन्यात व्हीआयपी रोडवरील कल्याण ज्वेलर्समधून बुरखाधारी महिलांनी दोन बांगड्या चोरुन नेल्या होत्या. त्यापैकी एकीला बुधवारी पकडले. पोलीस उर्वरित आरोपींच्या मागावर आहेत. हा गुन्हा उघडकीस येतो न येतो तोच, पुन्हा दुसऱ्यांना अशाचप्रकारे सोन्याच्या चार बांगड्या चोरीस गेल्याने सराफ बाजारात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूर