शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: सोलापूर जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचा पदभार प्रसाद मिरकले यांच्याकडे

By appasaheb.patil | Updated: March 20, 2024 21:06 IST

Solapur News: सोलापूर जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर यांच्या निलंबन कारवाईनंतर महिला व बालकल्याण विभागाचे प्रमुख प्रसाद मिरकले यांच्याकडे समाजकल्याण विभागाचा पदभार देण्यात आला आहे. 

- आप्पासाहेब पाटीलसोलापूर - जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर यांच्या निलंबन कारवाईनंतर महिला व बालकल्याण विभागाचे प्रमुख प्रसाद मिरकले यांच्याकडे समाजकल्याण विभागाचा पदभार देण्यात आला आहे. हा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी बुधवारी घेतला आहे.

आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनाकडून ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. मात्र, सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून ५० लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी एक लाख रुपयांचे अनुदान जमा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. याबाबत चौकशी सुरू असतानाच सीईओ आव्हाळे यांनी विभागीय चौकशीचा प्रस्ताव पुण्याला पाठविला. ही बाब ताजी असतानाच लातूर जिल्हा परिषदेत काम करीत असताना अनेक तक्रारी प्राप्त झाल्याचा ठपका ठेवत पुणे विभागीय समाजकल्याण विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी त्यांचे निलंबन केल्याचा आदेश मंगळवारी काढला. त्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेने समाजकल्याण विभागाचा पदभार कोणाकडे द्यायचा याबाबत बुधवारी दिवसभर चर्चा, बैठका घेतल्या.

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव व महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी प्रसाद मिरकले यांच्या नावाची चर्चा होती. सीईओ आव्हाळे यांनी दोन्ही अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर प्रसाद मिरकले यांचे नाव अंतिम झाले अन् मिरकले यांच्याकडे समाजकल्याण विभागाचा प्रभारी पदभार देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सीईओ आव्हाळे यांनी लोकमत शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूर